मुंबई : 'करोगे याद तो हर बात याद आयेगी' बाजार सिनेमातील गाण्यातून आज अनेक दशकांनंतरही हृदयात आपली जागा निर्माण केली आहे. अनेक सिनेमांत आपली उत्तम गाणी गाणारे खैयाम सहाब आज आपल्यात नाहीत. संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. कित्येक उत्कृष्ट गाण्याची भेट वस्तू देणारे खय्याम नाव सदैव सुवर्ण अक्षरे राहतील. चला तर मग जाणून घेवुयांत खय्याम यांच्या जीवनातील पान....
साधारणपणे एक गोष्ट ऐकली असेलच ही व्यक्ती संत टाईप होती. एकदम 'निर्मोही'... यांचं दुनियाशी काही घेणे-देणे नाही. आणि खय्याम साहेबांसोबत असंच काहीच घडलं. वयाच्या 17व्या वर्षापासून कारकिर्दीला सुरुवात करणारे खय्याम साहेबांनी 2012 मध्ये मुलगा प्रदीपला गमावला.
हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच निधन झालं. यानंतर कायमच ते बहुतेक वेळ त्यांच्या खोलीत एकटे घालवायचे. यानंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातही देखील ते दिसले नाही. त्यांनी त्यांच्या ९०व्या वाढदिवसादिवशी आपल्या आयुष्यातील सुमारे दहा कोटी कमाई ट्रस्टला दिली. त्यांनी 'खैय्याम जगजित कौर के.पी.जी चॅरिटेबल ट्रस्ट' मध्ये आपली सगळी दौलत दान केली ते चित्रपट इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करणाऱ्या लोकांना मदत करत होते.
गायक कलत अजित याचे ट्रस्टी आहेत. खय्याम साहेबांनी तलत अजित यांना अडचणीच्या काळात 'उमरावजान' मध्ये काम करण्याची संधी दिली आणि या चित्रपटाची गाणी सुपरहिट ठरली खय्याम आपला मुलगा मानत होते
या सिनेमात केलं उत्तम काम
1953 मध्ये 'फुटपाथ' या सिनेमांमधून त्यांनी बॉलीवूडच्या करिअरला सुरुवात केली. 1961मध्ये आलेला सिनेमा 'शोला और शबनम'मध्ये त्यांनी संगीत दिल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. 'आखरी खत', 'कभी कभी' 'त्रिशूल' 'नुरी' 'बाजार' 'उमराव जान' आणि 'यात्रा' या सिनेमात त्यांनी सुर दिले त्यांच्या शानदार कामाबद्दल त्यांना बरेच पुरस्कार मिळाले.