मुनव्वर फारुकीचा धक्कादायक खुलासा, एक्स गर्लफ्रेंडवर...

मुनव्वर फारूकीला 'त्या' गोष्टीचा पश्चाताप, आता माफी मागावी असे त्याला वाटते, वाचा मुलाखतीतले धक्कादायक खुलासे  

Updated: Sep 1, 2022, 09:42 PM IST
मुनव्वर फारुकीचा धक्कादायक खुलासा, एक्स गर्लफ्रेंडवर... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या वादग्रस्त रिअॅलिटी शो 'लॉकअप'चा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) अनेकदा चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासुन त्याचे अनेक राज्यातले शो रद्द होत आहेत. त्यामुळे तो चर्चेत आला आहेत. त्यात आता त्याने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. नेमकं या मुलाखतीत तो काय म्हणालाय, ते जाणून घेऊय़ात.  

मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) नुकतीच एक मुलाखत दिली होती. ही मुलाखत आता चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे या मुलाखतीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) या मुलाखतीत म्हणालाय की, मला माझ्या आयुष्यात अनेक गोष्टींचा पश्चाताप होतो. मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकलो नाही. मी आईला जास्त वेळ दिला नाही. मी माझे संपूर्ण आयुष्य मित्रांसोबत खेळण्यात घालवले. जेव्हा मी माझ्या आईची काळजी घेऊ शकत होतो. याबद्दल मला खेद वाटत असल्याचे तो म्हणतोय.  

'या' गोष्टीचा पश्चाताप
मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) पुढे म्हणाला की, रिलेशनशिप दरम्यान मी माझ्या गर्लफ्रेंडला धोका दिला होता. मी असे करायला नको होते. याबद्दल मला खूप पश्चाताप वाटतो. मी कधीच असा विचार केला नाही की, मी जर एखाद्याचं वाईट केलं तर माझंही वाईट होईल. कर्मा कधीच कोणाला सोडत नाही. पण जोपर्यंत कळते तिथपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मग तुम्ही फक्त त्या व्यक्तीच्या सुखासाठी प्रार्थना करू शकता,असे तो म्हणतोय. 

दरम्यान मुन्नवर फारूकीच्या (Munawar Faruqui) या मुलाखतीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.