प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखल केला बलात्काराचा गुन्हा, आरोपीला पोलिसांनी केली अटक

बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील एका व्यापाऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sunil Desale Updated: Mar 23, 2018, 04:01 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखल केला बलात्काराचा गुन्हा, आरोपीला पोलिसांनी केली अटक title=
File Photo

नवी दिल्ली : बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील एका व्यापाऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत आणि हे प्रकरण आता क्राईम ब्राँचकडे सोपवण्यात आलं आहे.

आरोपी व्यावसायिकाने माझा पाठलाग केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती असा आरोपही पीडित अभिनेत्रीने एका महिन्यापूर्वी केला होता.

या पीडित अभिनेत्रीचा पाठलाग करणं आणि धमकावल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीला फेब्रुवारी महिन्यात ताब्यातही घेतलं होतं. तसेच पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हाही दाखल केला होता.

पीडित अभिनेत्रीने जुहू पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, सरफराज उर्फ अमन खन्ना नावाचा एक व्यावसायिक घरी आला होता आणि माझ्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती तसेच मलालाही धमकी दिली होती.

पीडित अभिनेत्रीने आरोप केला आहे की, सरफराज गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेजेस पाठवत होता. त्यामुळे खूपच त्रस्त होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरु आहे.  पोलिसांनी सरफराज विरोधात ३५४ (ड) आणि ५०९ आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.