Pornography case: राज कुंद्रानंतर बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबई कोर्टाचा मोठा दणका

राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. 

Updated: Jul 29, 2021, 06:37 PM IST
 Pornography case: राज कुंद्रानंतर बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबई कोर्टाचा मोठा दणका title=

मुंबई : राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. 28 जुलै रोजी कोर्टाने राज कुंद्राची जामीन याचिका फेटाळली. आता पोर्नोग्राफीच्या प्रकरणात बऱ्याच अभिनेत्री राज कुंद्राच्या अ‍ॅप हॉटशॉट्सविरूद्ध उघडपणे बोलत आहेत. या प्रकरणात राज कुंद्रावर अश्ली-ल चित्रपट बनवण्याचा आणि प्रकाशित करण्याचा आरोप आहे. शर्लिन चोप्रानेही त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. तसंच राज कुंद्राने शर्लिनवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला होता.

मात्र आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आाला आहे. राज कुंद्रा अश्लील चित्रपटाच्या प्रकरणात, एकीकडे मुंबई क्राईम ब्रांचकडून नवीन खुलासे होत आहेत, तर दुसरीकडे शर्लिन चोप्राला मुंबई सत्र न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमेन राज कुंद्राशी संबंधित अश्ली-ल चित्रपट प्रकरणात शर्लिन चोप्राची अग्रिम जामीन याचिका कोर्टाने फेटाळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्राविरोधात ठाम पुरावे आहेत. एफआयआरनुसार राजकुंद्राचं नाव शर्लिन चोप्राने या प्रकरणात पोलिसांसमोर घेतलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्लिन चोप्रा असं म्हणाली की, राज कुंद्रानेच तिला अश्लिल उद्योगात आणलं. शर्लिन चोप्राला प्रत्येक प्रोजेक्टसाठी 30 लाख रुपये पैसे दिले जायचे. शर्लिनच्या म्हणण्यानुसार तिने असे 15 ते 20 प्रकल्प केले आहेत.