मुंबई : अजान विरूद्ध केलेल्या ट्विटमुळे सोनू निगमला धोका
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम एकदा पुन्हा या विषयामुळे चर्चेत आला आहे. मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सोनू निगमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस आसा सोनूची सुरक्षा वाढवणार आहे.
काही कट्टरपंथी संघटना सोनू निगमच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. गुप्तचर विभागाने पोलिसांना पाठविलेल्या अॅडव्हायजरीमध्ये सोनू निगमच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. कट्टरपंथी संघटना सोनू निगमला कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी तसंच इव्हेन्ट प्रमोशनच्या वेळी निशाणा बनवू शकतात. या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून सोनू निगमची सुरक्षा वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
सोनू निगम अनेकदा आपल्या वादामुळे चर्चेत राहिला आहे. देशात सगळ्यांना समान कानून असावा अशी देखील त्याने मागणी केली होती. तसेच तीन तलाकवर देखील सोनूने आपलं मत मांडल आहे. अजान विरूद्ध त्याने ट्विट करून आपलं मत व्यक्त केलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.