धक्कादायक! फेक फॉलोअर्स वाढवण्याचा स्कॅम उघडकीस

दिग्गज व्यक्तींच्या फेक प्रोफाईल तयार 

Updated: Jul 17, 2020, 10:12 AM IST
धक्कादायक! फेक फॉलोअर्स वाढवण्याचा स्कॅम उघडकीस  title=

मुंबई : मुंबई पोलिसांनी बॉलिवूड जगतातील कलाकार, बिल्डर्स आणि स्पोर्ट्स जगतातील मान्यवरांर करडी नजर ठेवण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या एका स्कॅमची माहिती मिळाली आहे. 

या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कंपनीचा देखील समावेश आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांनी चौकशीकरता एस.आय.टी कडे हे प्रकरण सोपवलं आहे. पोलिसांना संशय आहे की, असं केल्यामुळे देशाच्या कायदा आणि व्यवस्था धोक्यात येणार आहे.

आपल्या देशातील अशा पद्धतीचं हे पहिलं प्रकरण आहे. मुंबईत सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा मोठा स्कॅम असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई पोलिसांनी क्रिमिनल इंटेलिजेंस युनिट म्हणजे सीआययूने सोशल मीडियावर एक फेक प्रोफाइल बनवण्यासाठी अभिषेक दिनेश दौडे नावाच्या तरूणाला पोलिसांनी अटक केलं आहे. 

अभिषेकने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्कॅमचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये विदेशी सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी www.followerskart.com पोलिसांच्या निशाण्यावर आहे. आरोपी अभिषेकने आपण याच कंपनीकरता काम करत असल्याचं सांगितलं.

सोशल मीडियावर या फेक प्राफोइल बनवण्याचं रॅकेट इतकं मोठं आहे की, मुंबई पोलीस कमिश्नरने यांच्या चौकशीकरता डीसीपींच्या परवानगीने एक एसआयटी टीम तयार केली आहे. सोशल मीडियावर ज्या व्यक्तीचे फॉलोअर्स जास्त त्यांची लोकप्रियता सर्वात जास्त असं मानलं जातं. ही फक्त एक आवड नाही तर व्यवसाय देखील आहे. मोठ मोठ्या कंपन्या जाहीरातीकरता या लोकांना पैसे देखील देतात. मात्र मुंबई पोलिसांनी खोटे फॉलोअर्स वाढवण्याच्या या स्कॅमला बेनकाब केलं  आहे. 

हे संपूर्ण प्रकरण समोर आलं जेव्हा बॉलिवूड गायिका भूमी त्रिवेदीने तिचं सोशल मीडियावर खोटं प्रोफाइल बनवण्यात आलं. भूमी त्रिवेदीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची तक्रार मुंबई पोलीस कमिशनर परमबीर सिंह यांच्याकडे केली.