Lawrence Bishonoi Gang Shooters : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर (Baba Murder Case) बॉलीवूडचा अभिनेता सलमान खानची (Salman Khan) सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi Gang) घेतली. यानंतर पोलिसांकडून बिश्नोई गँगच्या शुटर्सना पकडण्याची मोहिम सुरु झाली आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांनी हरियाणातल्या पानीपत इथं बिश्नोई गँगचा शुटर सुख्खाला अटक करण्यात आली. सुख्खाने 2022 मध्ये लॉरेन्स बिश्नोी आणि गोल्डी बराडच्या सांगण्यावर सलमान खानच्या पनवेल इथल्या फॉर्म हाऊसची रेकी केली होती. फॉर्म हाऊसमध्येच सलमानर हल्ला करण्याचा प्लान होता, पण हा प्लान फेल झाला.
सलमानच्या गार्डशी दोस्ती
पोलसांच्या तपासात शुटर सुख्खाने धक्कादायक खुलासा केलाय. रेकी करण्यासाठी सुख्खाने सलमान खानच्या गार्डशी दोस्ती केली होती. त्याच्याकडून सलमानच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती, असं सुख्खाने म्हटलंय. फार्महाऊसला जाताना रस्त्यात सलमानवर निशाणा साधण्याचा प्लान बनवल्याचा दावाही सुख्खाने केला आहे. या प्लान आधी सलमानच्या मुंबईतल्या वांदे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता.
सलमानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबारानंतर सलमानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सलमानने मुंबई पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आपण आणि कुटुंबियांची हत्या करण्याचा कट रचला गेला असल्याचा दावा केला होता.
सुख्खाला पानीपतमधून अटक
हरियाणाल्या पानीपतमधन सुख्खाला अटक करण्यात आली. बिश्नोई गँगचा शुटर पानीपतमध्ये लपल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. या माहितच्या आधारे पोलिसांनी हरियाणात जाऊन कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मुंबई पोलिसांचं एक पथ हरियाणाला पोहोचलं आणि ज्या ठिकाणी सुख्खा लपला होता, त्या हॉटेलमध्ये धडक मारली. मुंबई पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या मदतीने या हॉटेलमधून सुख्खाला अटक केली. पोलिसांनी ज्यावेळी सुख्खाला अटक केली त्यावेळी तो पूर्णपणे नशेत होता. त्याला स्वत:चं नावही धड सांगता येत नव्हतं, इतकंच काय तर त्याल स्वत:च्या पायावरही उभं राहाता येत नव्हतं. आपली ओळख लपवण्यासाठी सुख्खाने दाढी वाढवली होती. पण पोलिसांनी फोटोच्या आधारे त्याची ओळख पटवली.
अनेक राज्यात बिश्नोईचं नेटवर्क
पोलिसांच्या तपासात सुख्खाने बिश्नोई गँगचं नेटवर्क अनेक राज्यात पसरलं असल्याची माहिती दिली. सलमानच्या मुंबईतल्या घरावर फायरिंग करण्यातही सुख्खाचा हात होता. हल्लेखोरांना सुख्खाने हत्यारं पुरवली होती, अशी माहिती समोर आली आहे.