फोटो ओळखता येतोय का? अंबानींच्या लेकिला टक्कर देणारी ही तरुणी आहे त्यांच्याच कुटुंबातील खास सदस्य

Mukesh Ambani Family : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची जितकी चर्चा होते तितकीच किंबहुना त्याहून जास्त चर्चा त्यांच्या कुटुंबाची होते.   

सायली पाटील | Updated: Feb 15, 2024, 12:52 PM IST
फोटो ओळखता येतोय का? अंबानींच्या लेकिला टक्कर देणारी ही तरुणी आहे त्यांच्याच कुटुंबातील खास सदस्य  title=
Mukesh Ambani family Met Gala 2023 Shloka Mehta Ambani sister diya mehta stylish look than Isha Ambani

Mukesh Ambani Family : व्यवसाय जगतामध्ये मुकेश अंबानी हे नाव मोठं आहे. भारतासोबतच आंतरराष्ट्रीय उद्योग जगतामध्ये दबदबा असणाऱ्या मुकेश अंबानी यांनी विविध क्षेत्रांमध्ये रिलायन्स उद्योग समुहाची मोहोर उमटवली आहे. अशा या मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांचीही सातत्यानं चर्चा सुरुच असते. अमुक एक कार्यक्रम, तमूक एक समारंभ आणि व्यवसाय क्षेत्रातील घडामोडींमध्ये अंबानी कुटुंबाचं नाव पुढे असतं. 

मुकेश अंबानी यांच्या मुलांप्रमाणंच त्यांची मुलगी, (Isha Ambani) ईशा अंबानी हीसुद्धा बहुविध कारणांमुळं चर्चेत असते. जागतिक स्तरावरील फॅशन विश्वातही ईशाचा सर्रास आणि तितकाच प्रभावी वावर असतो. तुम्हाला माहितीये का, ईशा मेट गालाच्या रेड कार्पेटवरही तिची छाप सोडताना दिसली आहे. पण, 2023 हे वर्ष मात्र अपवाद ठरलं. कारण, ईशा इथं थोडक्यात चुकली. आपल्या फॅशन सेन्सनं अनेकदा इतरांना घायाळ करणारी ईशा मेटच्या रेड कार्पेटवर मात्र एका सुंदर तरुणीपुढं फिकी पडली होती. 

कोण होती ती तरुणी? 

ईशानं मागच्या वर्षीच्या मेट गालामध्ये अशा पेहरावाला पसंती दिली होती ज्यामधून भारतीय संस्कृतीची झलक तर पाहायसा मिळालीच पण, तिचा स्टायलिश अंदाजही पाहता आला. पण, इथं काळ्या आणि मोरपिसी रंगाच्या ड्रेसमध्ये आलेल्या एका सौंदर्यवतीनं सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला. 

ही तरुणी दुसरीतिसरी कोणी नसून, अंबानींची थोरली सून श्लोका मेहता हिची बहिण दिया मेहता होती. तिचंही या धनाढ्य कुटुंबाशी अगदी खास नातं. दिया मेहता जटिया ही श्लोकाची बहीण असण्यासोबतच एका फॅशन कंपनीची मालकीणही आहे. मुंबईतील शालेय शिक्षणानंतर तिनं लंडनमधून फॅशन कन्युनिकेशनचं शिक्षण घेतलं. याशिवाय दिया स्वत:सुद्धा एक मॉडेल आहे. कौतुक म्हणजे दोन मुलांची आई असतानाही दिया तिच्या करिअरच्या वाटेवर तितक्याच आत्मविश्वासानं चालत आहे. 

Shloka Ambani's Sister Diya Mehta Jatia Goes Desi With Her Hairdo at Met Gala 2023, See Pics

Shloka Ambani's sister Diya Mehta Jatia's hairstyle does the talking

हेसुद्धा वाचा : तुरुंगातील महिला कैदी गर्भवती, Inside Story समोर; नेमकं काय घडलं? वाचा

 

मेट गालाच्या रेड कार्पेटवर दियानं न्यूयॉर्कमधील फॅशन डिझायनर प्रबल गुरुंगच्या डिझाईनला पसंती दिली होती. तिचा लूक इतका प्रभावी होता की पाहणारेही हैराण झाले. बरं ही श्लोका मेहताची बहीण आहे याची आजपर्यंत अनेकांना माहितीही नव्हती. अशी ही दिया खऱ्या अर्थानं स्वत:ची ओळख स्वत: तयार करून गेली.