'रोडिज' फेम सेलिब्रिटीच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन

'रोडिज'च्या सुरुवातीपासूनच चर्चेत असणारा...

Updated: Jan 8, 2020, 12:34 PM IST
'रोडिज' फेम सेलिब्रिटीच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन title=
फोटो सौजन्य : Instagram Raghu Ram

मुंबई : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध रिऍलिटी शो 'रोडिज'ला नेहमीच लोकप्रियता मिळत आली आहे. 'रोडिज'च्या सुरुवातीपासूनच चर्चेत असणारा रघु पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. प्रकाशझोतात येण्याचं कारणंही तसंच आहे... रघु रामच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रिपोर्ट्सनुसार, रघुची पत्नी आणि प्रसिद्ध सिंगर नताली दी ल्युसियोने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. नव्या पाहुण्याच्या येण्याने रघुराम आणि त्याची पत्नी अतिशय आनंदी आहेत. 

'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, रघुच्या पत्नीने ६ जानेवारीला मुंबईतील रुग्णालयात त्यांच्या पहिला बाळाला, मुलाला जन्म दिला. रिपोर्ट्सनुसार, रघुच्या पत्नीने वॉटर बर्थद्वारे बाळाला जन्म दिला आहे. 

 
 
 
 

A post shared by Raghu Ram (@instaraghu) on

काही दिवसांपूर्वी रघुने त्याच्या पत्नीसाठी बेबी शॉवरचं आयोजनही केलं होतं. या कार्यक्रमात त्यांचे कुटुंबिय आणि काही जवळच्या मित्रपरिवाराने हजेरी लावली होती. रघु आणि नताली २०१८मध्ये विवाहबंधनात अडकले होते.

रघुला नतालीविषयी सर्वात आधी यूट्यूब चॅनलवरुन माहिती मिळाली होती. यूट्यूबवरील नतालीच्या परफॉर्मेन्सने रघु प्रभावित होता. नतालीने 'जाने तू या जाने ना' चित्रपटातील 'कही तो होगी वो' गाण्यासाठी आवाज दिला होता. 

रघु रामचा नतालीआधी सुगंधा गर्ग हिशाची विवाह झाला होता. मात्र २९ जानेवारी २०१८ ला रघुने अधिकृतरित्या दोघं वेगळं झाल्याचं सांगितलं होतं.