रॅम्पवर महिला मॉडेल पडली; पुरुष मॉडेलनं पुढे जे केल.... व्हिडीओ तुफान व्हायरल

पुरूष मॉडेलने महिला मॉडेलसोबत जे केलं ते पाहण्यासारखं 

Updated: Feb 18, 2022, 11:08 AM IST
रॅम्पवर महिला मॉडेल पडली; पुरुष मॉडेलनं पुढे जे केल.... व्हिडीओ तुफान व्हायरल  title=

मुंबई :  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. एखादा व्हिडीओ तुम्हाला हसवतो तर दुसरा व्हिडीओ तुम्हाला विचार करायला लावतो. इंटरनेटमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये महिला कलाकारांच्या oops moment चा देखील समावेश असतो. असाच एक महिला मॉडेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

रॅम्पवर एक मॉडेल आपल्या शानदार शैलीत रॅम्प वॉक करत होती. तेव्हा तिचा पाय मुरगळला आणि तिचा तोल गेला. पांढऱ्या रंगाचा शॉर्ट टॉप घातलेल्या मॉडेलवर ओढवलेला हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैदा झाला. 

अचानक तोल गेल्यामुळे मॉडेल देखील गोंधळली. धाड करून महिला मॉडेल खाली कोसळली. ती खाली एवढ्या जोरात आपटली की सगळे स्तब्ध झाले. 

अचानक घडलेल्या या प्रसंगाला पाहून तेथे असलेला पुरूष मॉडेल धावून आला. त्या पुरूष मॉडेलने महिला मॉडेलला आपल्या मांडीवर उचलून घेतलं. 

महिला मॉडेलसोबत घडलेल्या प्रकारानंतर पुरूष मॉडेलने दाखवलेली समय सूचकता खूप कौतुकास्पद होती. या प्रसंगाच सोशल मीडियावर खूप कौतुक होतंय.  

इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पुरुष मॉडेल लोकांच्या नजरेत रोल मॉडेल बनले, तेव्हा महिला मॉडेलचे लोकांनी खूप कौतुक केले.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर crazyforcouture नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. सुमारे 18 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x