" इतकचं कळतंय तर राम कदमांनी चित्रपट बनवावा"; 'आदिपुरुष'वरुन मनसे आक्रमक

रावण कसा होता ते बघायला तुम्ही गेला होतात का? 

Updated: Oct 7, 2022, 11:44 AM IST
" इतकचं कळतंय तर राम कदमांनी चित्रपट बनवावा"; 'आदिपुरुष'वरुन मनसे आक्रमक title=

ओम राऊत (om raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाचा (adipurush) टीझर समोर आल्यापासूनच देश खळबळ उडाली आहे. चित्रपटामध्ये राम (lord ram), रावण (ravan) आणि हनुमानाचे (hanuman) पात्र ज्या पद्धतीने मांडण्यात आले आहेत त्यावरुन लोकांनी आक्षेप घेतला आहे. रावण (ravan) आणि हनुमानाच्या (hanuman) पात्रावरुन लोकांनी जोरदार टीका केलीय. यावरुन भाजपही (BJP) आक्रमक झाली आहे. उत्तर प्रदेशचे (UP) माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी  संपूर्ण सर्जनशील स्वातंत्र्य केवळ हिंदू धर्मासाठी आहे. तीच वागणूक इतरांसोबत केली तर जगणे कठीण होईल, असे म्हटलं आहे. तर भाजप आमदार राम कदम (Ram kadam) यांनी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिलाय. दरम्यान, ट्विटरवरही चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागली केली जात आहे.

यावरुन आता मनसेचे (MNS) चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (ameya khopkar) यांनी आदिपुरुष चित्रपटाला (adipurush) जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच विरोध करणाऱ्यांना इशारा दिला आहे. "95 सेकंदचा टिझर बाहेर येतो आणि त्यानंतर टिका होते. हे चुकीचं आहे. तुम्ही कोणी तो सिनेमा बघितला आहे का?" असा सवाल अमेय खोपकर यांनी केला आहे. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत तसेच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल असेही अमेय खोपकर यांनी स्पष्ट केलं आहे.

"विरोध करणाऱ्यांनी रावण बघितला आहे का? या चित्रपटामधून पुढच्या पिढीला चित्रपट पौराणिक गोष्टी तरी कळतील. राम कदमांना सिनेमा कळत असेल तर त्यांनी चित्रपट बनवावा. जागतिक सिनेमा कुठे चाललाय. चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या विरोधात बोलता येईल. एखादा चित्रपट बनवताना मोठी मेहनत लागते. त्यामुळे नव्या पिढीला वेगळ्या पद्धतीनं रामायण बघू द्या," असे अमेय खोपकर म्हणाले.

"राम कदम यांची ती वैयक्तिक भूमिका असावी. जर भाजपची किंवा इतरांची तशी भूमिका असेल तर आम्ही मनसे चित्रपटाच्याच्या पाठिशी उभे राहू. मी हा सिनेमा नक्की बघणार आहे. ओम राऊत यांनी यांनी तान्हाजी, लोकमान्य सिनेमा बनवलाय. तो कट्टर हिंदुत्ववादी आहे त्यामुळे तो असं काही करणार नाही," असेही अमेय खोपकर म्हणाले.

"तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी एखाद्या दिगर्दशकाला त्रास देऊ नका. तसेच सरकारनं अशा गोष्टींना पाठिशी घालू नये. एखादा चित्रपटाला जातीचा आणि धर्माचा ॲंगलनं बघू नये. आधी तो भारतीय आहे," असे अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले.