रिअ‍ॅलिटी शोमध्ये मिथुन चक्रवर्तींचा अपमान, पुढे जे घडलं...

बॉलिवूडचे 'डिस्को डान्सर' म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती आजकाल अनेक रिएलिटी शोमध्ये जज म्हणून दिसतात. 

Updated: Dec 19, 2021, 03:47 PM IST
रिअ‍ॅलिटी शोमध्ये  मिथुन चक्रवर्तींचा अपमान, पुढे जे घडलं... title=

मुंबई : बॉलिवूडचे 'डिस्को डान्सर' म्हणून ओळखला जाणारे मिथुन चक्रवर्ती आजकाल अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज किंवा स्पेशल गेस्ट म्हणून दिसतात. अलीकडेच मिथुन चक्रवर्ती 'डान्स प्लस 6' मध्ये पाहुणे म्हणून आले होते. यादरम्यान असं काही घडलं की, मिथुन चक्रवर्ती यांनी मध्येच शो सोडला. याचं खरं कारण म्हणजे त्यांचा झालेला अपमान करणं.

मधेच सोडला शो
'डान्स प्लस 6' चा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये मिथुन चक्रवर्ती शो मध्येच सोडून जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे मिथुन कोरिओग्राफर रेमो डिसूजाला सांगतात की, 'रेमो, तू मला फोन केलास, पण जर कोणी असा अपमान केला तर मी उठून निघून जाईन.' यानंतर मिथुन चक्रवर्ती व्हिडिओमध्ये शो सोडताना दिसत आहेत.

रेमो थांबवूनही मिथुन दा थांबले नाहीत
मिथुन चक्रवर्ती हे रेमोला सांगताच रेमोला धक्काच बसला. त्यालाही काही समजत नसल्याचं या व्हिडिओमध्ये पाहून स्पष्ट होत आहे. तो मिथुन दाला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण मिथुन चक्रवर्ती व्हिडिओमध्ये इतके संतप्त दिसत आहेत की, ते काही ऐकायलाच तयार नाहीत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ व्हायरल होत आहे
'डान्स प्लस 6' चा हा व्हिडिओ स्टार प्लसने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं- 'मिथुन दाच्या मध्येच उठून शोमधून बाहेर पडून स्पर्धक आणि न्यायाधीशांना धक्का बसला. महागुरूंना आवडले नाही असे काय झाले?'