Miss Universe Indonesia Sexual Harassment: मॉडेलिंग क्षेत्र हे जितकं ग्लॅमरस दिसतं तसं नसतं. त्या मॉडेल्सला किती गोष्टींचा सामना करावा लागतो त्यातून खूप कमी मॉडेल्स असताता ज्या स्वत: सिद्द करून दाखवतात. पण अनेक तरुणी या वाईट गोष्टींच्या जाळ्यात अडकतात. अनेकदा त्या मॉडेल्सला अशा गोष्टी कराव्या लागतात ज्यात त्यांना अस्वस्थ वाटत असते. तर बऱ्याच वेळा त्यांचा गैरफायदा देखील घेतला जातो. असंच काही मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत झालं होतं. आता ती गोष्ट समोर आली असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिस युनिव्हर्स इंडोनेशिया (Miss Universe Indonesia) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तरुणींनी आयोजकांवर लैगिंक शोषणाचे (Sexual Harasement ) गंभीर आरोप केले आहेत. त्याविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे.
मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेचे आयोजन करणाऱ्यांवर त्या सहा मॉडेल्सनं लैंगिक शोषणाविषयी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या सहा मॉडेल्सनं आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. टेस्ट घेण्याच्या नावावर आयोजकांनी मॉडेल्सना अश्लील पोज देण्यास सांगितले इतकंच नाही तर त्यांना टॉपलेज पोज देण्यास सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात लवकरात लवकर चर्चा करु असं सांगितलं आहे.
मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेचे 29 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन जकार्तामध्ये करण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्या सहा मुलींनी आरोप केले की आयोजकांनी मॉडेल्सची फसवणूक केली आणि त्यातील पाच मुलींना 20 पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत एका रुममध्ये शरीर तपासणी करावी लागेल असे सांगून त्यांना टॉपलेस व्हायला सांगत फोटोशूट केलं. त्यावेळी तिथे काही पुरुष उपस्थित होते. एवढंच नाही तर, मॉडेल्सचे व्हिडिओही बनवण्यात आले. इंडोनेशियामध्ये या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे.
ज्या मुलींनी ती तक्रार केली आहे त्यांची वकील मेलिसा एंगग्रेनीनं सांगितलं की आयोजकांनी या तरुणींवर दबाव टाकत सांगितलं की तपासणी करावी लागेल की त्यांच्या शरिरावर निशाना साधू शकत नाही. एंगग्रेनीनं सांगितलं की स्पर्धेच्या नावावर त्यांचा कपडे काढायला सांगितले, खरंतर त्या गोष्टीची काहीही गरज नव्हती. तर आरोप करणाऱ्या एका तरुणीनं सांगितलं की तिला पाय पसरवून पोज देण्यास सांगितले. त्यावेळी तिला असं वाटत होतं की तिच्याकडे सगळे लोग एकटक पाहत आहेत. त्यामुळे खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं.
हेही वाचा : अंकिता लोखंडे पुन्हा अडकली लग्नबंधनात, कोण आहे हा विकास? Video मुळं खुलासा
इंडोनेशिया हे एक इस्लामीक राज्य आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून तेथे ब्यूटी कॉन्टेस्ट्सना विरोध झाल्याचं समोर आलं आहे. पण आता या सहा तरुणींसोबत जे झालं ते पाहता तिथल्या लोकांना खूप संताप व्यक्त केला आहे. तर मिस युनिव्हर्स इंडोनेशियाचं आयोजन हे पीटी कॅपेला स्वास्तिका कर्या आणि कंपनीचे संस्थापक पॉपी कॅपेला यांच्या प्रवक्त्यांनी देखील धक्कादायक प्रकरणावर मौन बाळगलं आहे