मुंबई : शाहिद कपूर (Shahid Kapoor)ची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहेत. आता मीराने सोशल मीडियावर एक सेशन ठेवला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली आहे. यावेळी तिला तुझा सगळ्यात आवडता सेलिब्रिटी कोण? असा प्रश्न विचारण्यात आला.
सगळ्यांना वाटलं की, मीरा शाहिद कपूरचं म्हणजे आपल्या नवऱ्याचंच नाव घेईल. मात्र तिने एबी डी विलियर्सचं नाव घेतलं. याचं उत्तर देताना मीरा म्हणते की, मी याकरता माझ्या घरात लाइफलाइनचा वापर करून उत्तर देईन.
काही दिवसांपूर्वी मीराने एक ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केला होता. मीराने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर खूप पसंत आहे. मीराने प्रिंटेड स्विमसूट घालून फोटो शेअर केला आहे. मीराने स्वतःला फिट ठेवण्यासाठी शाहिदसोबत जिम ज्वाइन केली आहे.
मीरा राजपूत सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. मीरा राजपूत तिच्या स्टाइल आणि फॅशन सेंसमुळे नेहमीच चर्चेत असते. ग्लॅमरस - पारंपरिक आउटफिट असो किंवा ज्वेलरी, फुटवेअर अथवा स्टायलिश बॅग; सर्व गोष्टींची निवड मीरा स्वतःच करते. याच कारणामुळे तिच्या प्रत्येक लुकमध्ये पर्सनल टच पाहायला मिळतो. असे असतानाही नेटिझन्सकडून वारंवार तिची तुलना शाहिदची एक्स गर्लफ्रेंड व बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री करीना कपूरसोबत केली जाते. असेच काहीसे सोशल मीडियावर पुन्हा एकदा पाहायला मिळाले.