'आयर्न मॅन' ची पत्नी अंकिता कोंवरचा असा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल...

अंकिता कोंवरचा असा व्हिडिओ पाहून चाहते थक्क

Updated: Oct 9, 2021, 10:52 AM IST
'आयर्न मॅन' ची पत्नी अंकिता कोंवरचा असा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल... title=

मुंबई : अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) कायम त्याच्या फिटनेसमुळे आणि सोशल मीडियावरील फोटोंमुळे सतत चर्चेत असतो. शिवाय त्याची आई आणि पत्नी अंकिता कोंवर (Ankita Konwar) देखील अत्यंत फिटनेस फ्रिक आहेत. फिटनेसमुळे सोमन कुटुंब कायम चर्चेत असतं.  आता पुन्हा चर्चेत आली आहे अंकिता कोंवर. चर्चेत यायचं कारण म्हणजे  तिचा नवीन व्हिडिओ. 

व्हिडिओमध्ये अंकिता वर्कआऊट करताना दिसत आहे. अंकिताने यावेळी वर्कआऊट करताना मद्गरची मदत घेताना दिसत आहे. अंकिताचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'मद्गरच्या मदतीने नवा वर्कआऊट... यामुळे प्रचंड आनंद झाला...' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिलिंद फीटनेस फ्रीक   
मिलिंद सोमण हा अभिनेता आणि मॉडेल म्हणून अनेक वर्ष मराठी, हिंदी भाषेप्रमाणेच जगभरातील अनेक प्रोजेक्टचा भाग झाला होता. कलाक्षेत्राप्रमाणेच मिलिंद हा फीटनेस फ्रीक आहे.