...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण

इतक्या वयाच्या फरकाने मिलिंदशी लग्न करणाऱ्या मुली हे कसं काय ? यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. 

Updated: Apr 23, 2018, 01:05 PM IST
...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण  title=

मुंबई : २६ वर्षाच्या अंकिता तोंवरने ५२ वर्षाच्या आपल्या जमान्यात सुपर मॉडेल असलेल्या मिलिंद सोमणशी लग्न केल आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ५२ व्या वर्षी लग्न करणारा मिलिंद आणि इतक्या वयाच्या फरकाने मिलिंदशी लग्न करणाऱ्या मुली हे कसं काय ? यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. यावर उत्तर देताना याआधीची त्याची गर्लफ्रेंड शहाना गोस्वामी २१ वर्षांनी लहान होती पण तेव्हा अशी चर्चा न झाल्याचे तो सांगतो.  अशा अनेक चर्चांना मिलिंदने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलाय. मिलिंदचे पहिले लग्न फ्रेंच अभिनेत्री मिलेन जंपानोईसोबत झाले. २००६ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

आयुष्याची दौड

अंकिता तोंवर ही सीनीयर फ्लाइट अटेंडेंट होती. तिने २००५ ला सोमणसोबत १० कि.मी.चे पहिले मॅरेथॉन पूर्ण केलं होत. या १० कि.मीच्या मॅरेथॉनला त्यांनी आयुष्यभराची दौड बनवलय. मिलिंद आपल्या दिवसाची सुरूवात ५०१ पुशअपने करतो. लग्नाच्या दिवशीही त्याने हा दिनक्रम तसाच ठेवल्याचे 'मुंबई मिरर' ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले.

लग्न कधीपर्यंत चालेल ?

मिलिंदचे हे लग्न कधीपर्यंत चालेल ? असा प्रश्नदेखील विचारला जातो. त्यावर तो माहित नाही असे उत्तर देतो.मिलिंदने १४ वर्षाचा असल्यापासून मुलींना डेट करायला सुरूवात केली. इतक्या मुली मिलिंद सोमणच्यामागे का लागतात ? असा तरुणांना नेहमी प्रश्न पडतो. आतापर्यंत कोणाशीच संबध वाईट झाले नसल्याचेही तो सांगतो. याबाबत आपण खुशनशीब असल्याचे तो सांगतो.    प्रत्येकाच्या जगण्याचे नियम असतात आणि एकमेकांना स्पेस देण हाच प्रेमाचा नियम असल्याचे मिलिंद सांगतो.