राधिका-सौमित्रच्या लग्नात गुरू विघ्न आणणार?

गुरूनाथ नेमकं काय करणार? 

Updated: Dec 23, 2019, 03:05 PM IST
राधिका-सौमित्रच्या लग्नात गुरू विघ्न आणणार? title=

मुंबई : राधिका आणि सौमित्र लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या मालिकेत या दोघांच्या लग्नाचीच गडबड सुरू आहे. सगळीकडे या दोघांच्या लग्नाचा उत्साह पाहायला मिळत आहे. असं असताना नेहमीप्रमाणे राधिकाच्या आनंदाला गालबोट लागणार का? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. 

राधिका आणि सौमित्र यांचा विवाह सोहळा 23,23 आणि 25 डिसेंबर रोजी असणार आहे. एवढी वर्ष सून म्हणून सुभेदार दाम्पत्यांनी तिचा सांभाळ केला पण आता मुलगी म्हणून ते तिला निरोप देणार आहेत. गुरूनाथसोबत घटस्फोट घेतल्यानंतर राधिका आणि सौमित्र विवाहबंधनात अडकणार आहेत. (राधिकाचा सून ते मुलीपर्यंतचा प्रवास) 

पण राधिकाला असं सहजासहजी आनंद साजरा करून देईल तो गुरूनाथ कसला. गुरूनाथ, शनाया आणि आता त्यांच्या जोडीला शनायाची मम्मा एकत्र येऊन या सोहळ्यात विघ्न आणणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. राधिकाला आनंद या तिघांनी कधीच साजरा करून दिलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा सौमित्रच्या रुपात तिच्या आयुष्यात आनंद येणार आहे. हा आनंद फार काळ टिकणार का? हे पाहणं गरजेचं असणार आहे. (राधिका आणि सौमित्रच्या नव्या आयुष्याला सुरूवात) 

याबाबत गुरूने सांगितलं की,'नक्की काही तरी करणार का? पण ते विघ्न आणणार की काही चांगल करणार. हे मात्र अद्याप गुरूनाथने सांगितलेलं नाही. पण काही तरी करणार हे मात्र गुरूने सांगितलं.' त्यामुळे राधिका-सौमित्रच्या विवाहसोहळ्याबरोबरच गुरू काय करणार? याकडे प्रेक्षकांच लक्ष लागून राहिलं आहे. तसेच राधिका लग्नानंतर सौमित्रसोबत परदेशात जाणार की राधिका मसाले हा आपला व्यवसाय सांभाळणार ही देखील प्रेक्षकांसाठी उत्सुकतेची बातमी असणार आहे.