माझ्या नवऱ्याची बायको : गुरूची आई दागिने विकून करतेय मदत

काय होणार पुढच्या एपिसोडमध्ये 

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची सुरुवात गुरूच्या ऑफिसपासून झाली. राजवाडेंच्या बोलण्याने वैतागलेला गुरु, रागाने आपला राजीनामा देण्याची धमकी राजवाडेंना देतो, ते ऐकून राजवाडे म्हणतात, जर का तुम्ही राजीनामा देणार असाल तर तुमच्यावर कंपनी फ्रॉडची केस करेल आणि कंपनीचे सारे नुकसान तुम्हांला भरून तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल. हे ऐकून गुरुच्या पायाखालची जमीनच सरकते. दरम्यान सरीता आपल्या बांगड्या आणि सोन्याची माळ विकत असताना राधिकाच्या वाहिनी त्यांना बघून चिंतेने व्याकुळ होते. नक्की काय झाले असेल याचा तिला थांग लगत नाही.

दुसरीकडे राजवाड्यांचे बोलणे खाऊन ऑफिसबाहेर पडलेले गुरु आणि शनाया एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. त्यातून परिस्थिती एवढी गंभीर होते की दोघांचेही कडाक्याचे भांडण हॊते. तेवढ्यात सरीता गुरूला फोन करून सांगते तुझ्यासाठी पैशांचा बंदोबस्त मी केला आहे. तू लवकर पैसे घ्यायला ये असे गुरूला सांगते. म्हणून गुरु एका कुरिअर वाल्याच्या गेटअप मध्ये पैसे न्यायला येतो. परंतु घरी कुणी असेल या भीतीने पार्किंगमधूनच आपल्या आईला फोन करून घरी येऊ का असे विचारतो. दरम्यान राधिकाही घराच्या दिशेने येऊ लागते. गुरु आपल्या आईकडून पैसे घेण्यात यसशस्वी होईल की, तेवढ्यात राधिका तेथे येऊन गुरुचे पितळ उघडे पाडेल? हे बघण्यासाठी उद्याचा एपिसोड आवर्जून अगदी न चुकता बघा.