राहुल्याकडे जबाबदारी देऊन भैय्या कोणता गेम खेळतो?

शितली आता काय करणार? 

मुंबई : लागिरं झालं जी या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या २३ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात राहुल्याच्या घरापासून झाली. सकाळी सकाळी शीतल राहुल्याला भेटायला येते. शीतल भेटायला आली आहे असे राहुल्याला कळताच राहुल्या बाहेर येतो. तेव्हा शीतल त्याला विचारते आज प्रॅक्टिसला का आला नाहीस. आज माझे एक महत्वाचे काम असल्यामुळे मी प्रॅक्टिसला आलो नाही असे राहुल्या शीतलला सांगतो. ते ऐकून शीतल म्हणते प्रॅक्टिस सोडून आता तुही त्या भय्याच्या नादाला तर लागला नाहीस ना. तेव्हा राहुल्या होकार देत म्हणतो की, भय्याच्या अनेक गोष्टी आजही मला पटत नाही पण ही कमानीची गोष्ट मला पटली आहे आणि मी ती पूर्ण करणार आहे असे बोलून राहुल्या गप्प होतो, मग त्याला समजावत शीतल म्हणते, भय्या हा संधी साधू आहे, त्याने तुला कामाला लावून स्वतः बाजूला झाला आणि एकदा का कमानीचे उदघाटन झाले की कुणी त्या कमानीकडे ढुंकूनही बघणार नाही.

तिच्या बोलण्याने राहुल्याची आई सुद्धा राहुल्याला शीतलचे म्हणणे बरोबर आहे असे सांगते. पण राहुल्याला शीतलचे म्हणणे मुळीच पटत नाही उलट भय्यावर जास्तच विश्वास आहे असे म्हणतो आणि भय्याने त्याच्याकडे ठेवायला दिलेले पैसे शीतलला दाखवतो. दरम्यान सारखे सारखे भय्यावर अविश्वास दाखवणे बरे नाही. दुसरीकडे शीतलचा भाऊ घरी जाऊन नानांना म्हणतो, नाना हजार रुपये वर्गणी न भरण्याएवढे गरीब आहोत का आपण? परंतु त्याबद्दल नानांना काहीच माहित नसते. दरम्यान घरच्यांकडून नानांना सर्व प्रकार कळतो. तेव्हा ते वर्गणी आपणही देऊया पण ते सर्वांना शक्य होईल का असे म्हणतात. त्यावेळी शीतलचा भाऊ म्हणतो की सर्वांनी दिली फक्त आपण आणि शीतल ताईनेच नाही दिली. दरम्यान भाऊ शीतलच्या अशा वागणुकीमुळे वैतागतो. त्याचा शांत करीत नाना आजच पैसे देतो असे म्हणतात.

संध्याकाळी विक्रमच्या कमानी बद्दलची सर्व हकीकत शीतल अज्याला सांगते, तेव्हा अज्या शीतलला म्हणतो त्यांच्याकडे तू जराही लक्ष देऊ नकोस. फक्त तू तुझ्या कॉलेजकडे लक्ष . दरम्यान घरातली काम होत नसल्यामुळे मी बाहेरून कॉलेज करेन असे शीतल अज्याला सांगते. दुसऱ्या दिवशी सरीता राहुल्याला फोन करते आणि ते पाहून राहुल्या खुश होतो. फोन उचलल्यावर सरीता म्हणते मी एक कविता लिहिली आहे पण ती अर्धवट आहे, ती तू पूर्ण करशील का? दरम्यान राहुल सरीताची कविता पूर्ण करतो. पुढे तू एम ए ला मराठी विषय घे असे सरीता राहुल्याला सांगते. सरीताने फोन ठेवल्यावर राहुल्या जाम खुश होतो. तिकडे शीतल वाटेने जात असताना भय्यासाहेब आजपासून रोज विक्रमच्या आईला डब्बा घेऊन जाणार आहेत असे भय्याच्या मित्रांना बोलताना ऐकते. दरम्यान भय्यासाहेब विक्रमच्या आईकडे डब्बा घेऊन जातो आणि म्हणतो आजपासून तुम्ही जेवण करायचे नाही, तेव्हा आजपासून तुमच्यासाठी आमच्या घरातून जेवण येणार. पण विक्रमाची आई त्याला नकार देते. तेव्हा भय्यासाहेब आणि टॅलेंट विक्रमच्या आईला समजावू लागतात. तेवढ्यात तिथे शीतल येते आणि विक्रमच्या आईला आतल्या खोलीत जाते आणि सांगते की, डब्बा घेऊ नकोस. तेव्हा आई म्हणते गुरुजी आणि तात्या असताना नाही कसे म्हणू मी. तिला धीर देता शीतल म्हणते बिंधास्त नकार देऊन टाक असे शीतल म्हणते. शीतलच्या सांगण्यावर विक्रमाची आई भय्यासाहेबांनी आणलेल्या डब्याला नकार देईल का हे बघण्यासाठी लागिरं झालं जी या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.