शीतलीच्या घरात 'लगीनघाई' सुरु

Updated: May 23, 2018, 02:55 PM IST

मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध 'लागिरं झालं जी' या मालिकेतील शीतलीच्या घरी लगीनघाई सुरु झालीये. शीतल आणि अजिंक्यचं येत्या ३० मेला विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्नासाठी शीतलच्या घरात जोरदार तयारी सुरु आहे. नवऱ्यामुलीचे घर असल्याने लहानसहान गोष्टींकडेही लक्ष दिले जातेय. सामुदायिक विवाह सोहळ्यात हा विवाह पार पडणार आहे. यामुळे सेटवरही लगबग सुरु आहे. लग्नासाठी शीतलचे घर फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेय. घरासमोर मोठा मंडपही घालण्यात आलाय. पाहुण्यांची लगबग सुरु झालीये. खरेदी सुरु आहे. लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. आज्याचे मित्रही लग्नाची जोरदार तयारी करतायत. शीतलच्या मैत्रिणीही लग्नात आल्यात. लग्नासाठी धावपळ सुरु आहे...मग तुम्ही येताय ना लग्नाला...लागिरं झालं जीच्या सेटवरुन exclusive