Malaika Arora Father Post Mortem Report : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांचे वडील अनिल मेहता यांनी मुंबईतील वांद्रेमधील राहत्या घरी आत्महत्या केली अशा बातम्या समोर आल्यात. त्यांनी बिल्डिंगच्या 7 मजल्यावरुन उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. या घटनेच्या वेळी त्यांची पत्नी जॉयसी या घरात होत्या. तर मलायका अरोरा एका कार्यक्रमासाठी पुण्यात गेली होती. ही बातमी मिळताच मलायकाने मुंबई गाठली. बुधवारी या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. या घटनेनंतर सर्वप्रथम मलायकाचा एक्स नवरा अरबाज खान हा तिच्या आईच्या घरी पोहोचला होता. त्यानंतर अख्ख खान कुटुंब अगदी सोहेल खानची एक्स पत्नीही या दु:खाच्या क्षणी तिथे पोहोचली होती. अर्जुन कपूर असो किंवा तिचे बेस्ट फ्रेंड करिना कपूर आणि करिश्मा कपूरही तिला आधार देण्यासाठी होत्या. (Marks of injury on Malaika Arora father body post mortem report reveals cause of death)
या दुर्घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकार मलायकाला धीर देण्यासाठी आले होते. प्रथमदर्शनी आणि बिल्डिंगचा वॉचमन, अनिल मेहता यांची पत्नी जॉयसी यांनी सांगितल्यानुसार ही आत्महत्या आहे, असंच म्हटलं जातं होतं. काही जणांचं म्हणं होतं की ते मानसिक आजारी होते. पण पत्नी जॉयसी यांनी पोलिसांनी अनिल आजारी नव्हेत अस सांगितलंय आहे. तर सोशल मीडियावर मलायका अरोरा हिच अर्जून कपूरसोबतच नातं तुटल्यामुळे ते दु:खी होते. कारण मुलीचं घर दोन वेळा तुटल्याने ते दु:खी असतील असं म्हटलं जातंय. त्यात घटनेच्या काही वेळापूर्वी त्यांनी मलायका आणि अमृता या दोघींना फोन केला होता आणि आपण थकलो आहोत, असं म्हटलं होतं. त्यामुळे जे आजारपणाला कंटाळले होते असा अंदाज लावण्यात येतोय. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आलंय. हा अपघात आहे की आत्महत्या आहे की अजून काही हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सांगण्यात आलंय.
आज तकच्या रिपोर्टनुसार, अनिल मेहता यांचा मृत्यू शरीरावर अनेक जखमांमुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. वृत्तानुसार, अनिल मेहता यांच्या शरीरातून व्हिसेरा जपून ठेवण्यात आला आहे जेणेकरून या प्रकरणाच्या पुढील तपासात मदत होईल.
दरम्यान अनिल मेहता गेल्या 2 वर्षांपासून डिप्रेशनमध्ये असल्याची बातमी होती. काही वर्षांपूर्वी अनिलचे डिप्रेशन खूप वाढले होते, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागलं होतं, असं सांगण्यात आलंय. अनेक महिने ते हॉस्पिटलमध्ये होते.