मरजावां ट्रेलर : 'मैं बदला नहीं लूंगा सर, मैं इंतकाम लूंगा.'

 'मरजावां' चित्रपटाचा ट्रेलर

Updated: Sep 26, 2019, 05:38 PM IST
मरजावां ट्रेलर : 'मैं बदला नहीं लूंगा सर, मैं इंतकाम लूंगा.' title=

मुंबई : 'मैं मारूंगा मर जाएगा, दोबारा जन्म लेने से डर जाएगा' अशा एकापेक्षा एक डायलॉगने सजलेल्या 'मरजावां' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख, अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाची कथा दोन प्रेमी युगूलांच्या भोवती फिरताना दिसत आहे. 

सोशल मीडियावर ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. अॅक्शनने परिपूर्ण असलेल्या चित्रपटात रितेश खलनायकाची भूमिका साकारताना दिसत आहे. त्यासोबतच रोमान्स आणि उत्तम संवादांचा तडका दिला आहे.

'मरजावां' चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केलं आहे. तर निर्मिती भूषण कुमार,निखिल अडवाणी, दिव्या खोसला-कुमार, कृष्णा कुमार यांनी केली आहे.