'वय वर्ष १६....'; ओळखलं का, या मराठमोळ्या अभिनेत्याला?

मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमधून जिंकतो प्रेक्षकांची मनं...   

Updated: Aug 17, 2020, 11:06 AM IST
'वय वर्ष १६....'; ओळखलं का, या मराठमोळ्या अभिनेत्याला?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जणांची अशी रुपं समोर येतात जी कित्येकदा थक्क करणारी असतात. असाच एक व्हिडिओ सध्या एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हा अभिनेता ऐन सोळाव्या वर्षात असल्याचं दिसत आहे. मुळात त्यानंच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. 

हा व्हिडिओ आहे एका जाहिरातीचा. एक अशी जाहिरात ज्यामुळं सोळाव्या वर्षीच या मुलाची महाविद्यालयामध्ये भलतीच हवा झाली होती. आता तुम्ही म्हणाल कोण बरं हा अभिनेता? तर, हा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. 
चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अमेयचा सोशल मीडियावरील वावर हा विशेष लक्षवेधी असतो. त्याच्या पोस्टपासून त्या पोस्टच्या कॅप्शनपर्यंत सगळंच कुतूहल वाढवणारं आणि अर्थातच त्याच्यातील कलाकार वेळोवेळी आपल्या भेटीला आणणारं. 

अशा या अमेयनं यावेळी एक फार जुन्या जाहिरातीला व्हिडिओ शेअर करत सुरुवातीच्या काळातील काही आठवणींना उजाळा दिला. 'य वर्ष १६.... अंगात नुसती हाडं आणि उत्साह! ही जाहिरात tv वर आल्यानंतर कॉलेज मध्ये “फूक मारनारा पोरगा” म्हणून हवा झाली होती!', असं कॅप्शन त्यानं या व्हिडिओला दिलं. 

अमेयनं पोस्ट केलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांनीच आश्चर्याचा धक्का बसल्याप्रमाणं प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुळात ही जाहिरात तशी लोकप्रिय, पण त्यातला हा मुलगा अमेय असेल हे अनेकांच्याच लक्षातही आलं नव्हतं. त्यामुळं अमेयनं खऱ्या अर्थानं या व्हिडिओच्या निमित्तानं का असेना सर्वांनाच गतकाळात नेऊन ठेवलं जेव्हाच्या जाहिरातीसुद्धा प्रेक्षक अजून विसरु शकलेले नाहीत.