मुंबई : डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर आधारित ' तात्या लहाने- अंगार Power is within' हा मराठी चित्रपट उदया ( 16 ऑगस्ट) विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे.
या चित्रपटात विराज वानखेडे लिखित ' काळोखाला भेदून टाकू ..' हे गाणं रिले सिंगिंग पद्धतीमध्ये सादर केले जाणार आहे. 16 ऑगस्ट रोजी नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या ऑडीटोरियममध्ये ३२४ गायक गाणं गाणार आहेत.
काय असेल हा रिले सिंगिंग प्रकार ?
विराज वानखेडे लिखित ' काळोखाला भेदून टाकू ..' हे गाणं सादर केले जाईल. या गाण्यासाठी महाराष्ट्रभरात गायकांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यापैकी निवडेलेले ३२४ गायक १०८ शब्दांचं गाणं गाणार आहेत. पण या दरम्यान सलग ३ सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता राखत प्रत्येक गायक एक शब्द गाणार आहे. गायकांमध्ये कोल्हापूरचे आमदार सुजित मिंचेकर यांचाही समावेश आहे.
या गाण्याचा विश्वविक्रम पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि ' गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'चे काही पदाधिकारी सहभागी होणार आहेत. ' तात्या लहाने- अंगार Power is within'हा चित्रपट ६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात निशिगंधा वाड, मकरंद अनासपुरे आदी कलाकार दिसणार आहेत.