लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...

महान मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्रात मराठी दिवस साजरा केला जातो. 

Updated: Feb 27, 2019, 11:26 AM IST
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... title=

मुंबई : महान मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्रात मराठी दिवस साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रजांनी त्यांच्या कारकिर्दीत १६ खंडांची कविता, तीन कादंबरी, लघुकथेचे आठ खंड, १८ नाटकं आणि ६ एकांकिका लिहिल्या. आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. २७ फेब्रुवारी या मराठी दिवसाला 'मायबोली मराठी ऊषा दिन', 'मराठी भाषा गौरव दिन', 'जागतिक मराठी राजभाषा दिन' इत्यादी नावांनी संबोधले जाते.

जनसामान्यांपासून कलाकार आणि राजकीयमंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी  ट्विटरच्या माध्यमातून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्यांच्या या पोस्टमधून मराठी भाषा जपण्याचा संदेश दिला आहे.

 

 

अभिनेता सिद्धार्थ जाधवने महान कवि कुसुमाग्रजांचा एक फोटो पोस्ट करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मराठी अभिनेत्री श्रृती मराठे हिने अनोख्या कॅप्शन सहित मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.