मुंबई : मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच सोशल मीडियावरून चर्चेत असते. नेहा 'बिग बॉस १२' या रिअॅलिटी शोचा भाग होती. या शो दरम्यान नेहा अनेकांची आवडती खेळाडू ठरली होती. 'बिग बॉस १२' शो संपल्यानंतर अजूनही तिला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नेहाचे इन्स्टाग्रामवर मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. नेहा तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच नेहाने सोशल मीडियावर पोस्ट केलेले तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. नेहाने नुकताच तिचा जीममधला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत नेहा स्ट्रेचिंग करत असून तिचा हा फिटनेस व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
मुंबईत जन्मलेली नेहा शुभांगी पेंडसे यांची मुलगी आहे. ३३ वर्षीय नेहाने आतापर्यंत मराठी, तमिळ, तेलुगू, मल्ल्याळम तसंच हिंदी चित्रपटांतून काम केलं आहे. टेलिव्हिजन शो 'मे आय कम इन?'मधून नेहाने साकारलेल्या 'संजना' या भूमिकेतून ती लोकप्रिय झाली. 'भाग्यलक्ष्मी' या मराठी शोमधूनही तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. २०१४ साली आलेल्या 'प्रेमसाथी कमिंग सून'साठी तिने तब्बल १५ किलो वजन कमी केलं होतं. काही दिवसांपूर्वी नेहाने केलेला पोल डान्सही चांगलाच व्हायरल झाला होता.
नेहाने 'हसरतें', 'कॉमेडी दंगल', 'फॅमेली टाईम विथ कपिल शर्मा', 'इंटरटेनमेंट की रात', यासारख्या शोमधून अनेक भूमिका साकारल्या आहेत. 'दाग: द फायर', 'देवदास', 'स्वामी' या चित्रपटातूनही तिने काम केलं आहे. ९०च्या दशकांत नेहाने बालकलाकार म्हणूनही काम केलं आहे.