Forbes India 30 Under 30 मध्ये 'या' मराठमोळी अभिनेत्री सहभागी

कप साँगमुळे लोकप्रिय झालेली मिथिला पालकर. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 6, 2018, 12:31 PM IST
Forbes India 30 Under 30 मध्ये 'या' मराठमोळी अभिनेत्री सहभागी  title=

मुंबई : कप साँगमुळे लोकप्रिय झालेली मिथिला पालकर. 

मिथिला पालकरच्या कामाची नोंद फोर्ब्स इंडियाच्या 30 अंडर 30 च्या यादीत नावाचा सहभाग झाला आहे. आपल्या क्षेत्रात हटके काम केलेल्या यादीत सहभागी झाली आहे. यामध्ये भूमी पेडणेकरचा देखील सहभाग आहे. 

वेब क्वीन आणि ‘मुरांबा’ फेम अभिनेत्री मिथिला पालकरचं नाव प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ‘फोर्ब्स इंडिया’ या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीमध्ये झळकलंय. ‘फोर्ब्स’ने आशिया खंडातील आश्वासक ३० युवक-युवतींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये मिथिलाने मराठीचा झेंडा फडकावत या यादीत स्थान पटकावलंय..  यापूर्वी निपुण धर्माधिकारी आणि आलोक राजवाडे यांनी फोर्ब्सच्या या यादीत स्थान मिळवलं होतं.

10 महिलांची नावे या यादीत सहभागी फोर्ब्स 2011 पासून 30 अंडर 30 ही यादी जाहीर करत आहे. 2014 पासून फोर्ब्स इंडियाची लिस्ट देखील जाहीर होत आहे. यामध्ये 30 भारतीय महिलांचा समावेश आहे. यावर्षी 9 जागांवर 10 महिलांचा समावेस आहे. यामध्ये खेळ जगतातील बुमराह, हरमनप्रीत कौर, हिना सिंध्दू आणि सवित पुनिया मनोरंजन क्षेत्रातील विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि मिथिला पालकर.