'स्वर्गात आणि कोकणात जायचा रस्ता कठीण...', मुंबई-गोवा हायवेवर अभिनेत्रीने मांडलं परखड मत, VIDEO व्हायरल

Gauri Kiran : मराठमोळी अभिनेत्री गौरी किरणनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत कोकणातील रस्त्यांची सध्य परिस्थिती सांगितली आहे. इतकंच नाही तर त्याची तुलना गौरीनं स्वर्गातील रस्त्यांशी केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 28, 2023, 02:45 PM IST
'स्वर्गात आणि कोकणात जायचा रस्ता कठीण...', मुंबई-गोवा हायवेवर अभिनेत्रीने मांडलं परखड मत, VIDEO व्हायरल title=
(Photo Credit : Gauri Kiran Instagram)

Gauri Kiran : पावसाळा हा ऋतू अनेकांना आवडतो. पण पावसाळा आल्यानंतर अनेक गोष्टींचा सर्वसामान्य लोकांना त्रास होतात. त्यापैकी एक म्हणजे खूप पाऊस आल्यानंतर रेल्वे बंद पडण्याची शक्यता आणि त्याचसोबत रस्ते वाहतूक ठप्प होण्याची भीती. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? ती म्हणजे त्यावेळी रस्त्यांच्या होणाऱ्या दुरावस्थेमुळे तर अनेकांचे जीव धोक्यात जातात. अनेक लोक हे जिथे पोहोचायचं असतं त्या ठिकाणी खूप उशिरा पोहोचतात. रस्ते खराब असले की त्याचा सगळ्याच गोष्टीवर परिणाम होतो. गेल्या काही दिवसांपासून रस्त्याची दुरावस्था पाहून अनेकांनी त्यावर अनेक सेलिब्रिटी बोलताना दिसतात. अशात आता एक मराठी अभिनेत्री पुढे आली आहे तिनं देखील रस्त्यांच्या दुरवस्थेवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. ही अभिनेत्री दुसरीकोणी नसून 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्री गौरी किरण आहे. गौरी किरणनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला असून रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी सांगितले आहे. 

गौरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गौरीनं काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जॅकेट परिधान केलं आहे. तर त्यासोबत ऑलिव्ह रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केली होती. या व्हिडीओत गौरी बोलताना दिसते की 'कोकण हा खराच स्वर्ग आहे, कारण स्वर्गात जायचा रस्ता जितका कठीण असतो तितकाच कोकणात जायचा रस्ता कठीण आहे'. त्यानंतर लगेच गौरी मुंबई-गोवा हायवे दाखवते. त्या रस्त्यावर असलेले मोठे-मोठे खड्डे पाहायला मिळत आहे. अशा खड्ड्यांमध्ये कशा प्रकारे गाडी चालवत आहेत हे पाहून सगळ्यांनाच भीती वाटेल असं वातावरण तयार झालं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Welcome 3 मधून उदय शेट्टी आणि मजून भाईला डच्चू? निर्माते शोधतायत नवा पर्याय

गौरीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, 'मराठी कलाकार सुद्धा अश्या सामाजिक प्रश्नावर बोलतात तेव्हाच आपल्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा विकास होईल. कारण सरकारी प्रतिनिधी या गोष्टींवर लक्षच घालत नाही. कलाकरांच्या मदतीने तरी सामान्य माणसाला न्याय मिळेल.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तरी काही फरक पडणार नाही या राजकारण्यांवर. पण तुमचा प्रयत्न हा योग्य आणि उत्तम आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'चंद्र पण असाच आहे.' आणखी एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'रस्त्यात खड्डे..आहेत की खड्ड्यात रस्ते हाच मोठा प्रश्न आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आपल्याला ग्रहीत धरलंय.' अशाच अनेक कमेंट करत अनेकांनी गौरीला पाठिंबा दिला आहे.