विकास बहल माझ्यासोबतही... - कंगना रानौत

'मी पूर्णत: त्या महिलेवर विश्वास करते'

Updated: Oct 7, 2018, 09:33 AM IST
विकास बहल माझ्यासोबतही... - कंगना रानौत title=

मुंबई : बॉलिवूडची 'झासीची राणी' कंगना रानौतनं 'क्वीन' सिनेमाचा दिग्दर्शक विकास बहल यांच्यावरही लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाय. 'फॅन्टम फिल्म्स' या प्रोडक्शन हाऊसच्या एका महिला कर्मचाऱ्यानं दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. त्यानंतर कंगनानंही यावर भाष्य केलंय. 'फॅन्टम फिल्म्स'च्या महिला कर्मचाऱ्यानं गेल्या वर्षी विकास बहलनं तिच्यासोबत गोवा प्रवासादरम्यान अयोग्य वर्तन केलं होतं. विकास बहल अगोदर फॅन्टम फिल्म्समध्ये अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि मधु मंतेना यांच्यासोबत भागीदार होते.

अधिक वाचा : अखेर 'फँटम' बंद

महिलेचा आरोप

'हफपोस्ट इंडिया'मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका लेखात महिलेनं त्या घटनेचा विस्तृतपणे उल्लेख केला होता. आता याच महिलेच्या समर्थनार्थ कंगना पुढे आलीय. 'मी पूर्णत: त्या महिलेवर विश्वास करते. २०१४ साली आम्ही जेव्हा क्वीन सिनेमाचं शुटींग करत होतो तेव्हा विवाहीत असूनही बहल माझ्यासमोर बढाया मारत की ते कसं रोज एका नव्या मुलीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करतात' असं कंगनानं म्हटलंय. 

Image result for vikas bahl kangana ranaut

माझ्यासोबतही असभ्य वर्तन

'जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा विकास माझ्या मानेवर आपला चेहरा ठेवून मला घट्ट धरून ठेवत आणि माझ्या केसांचा वास घेत... त्यांना माझ्यापासून दूर करण्यासाठी मला माझी पूर्ण शक्ती लावावी लागत असे' असंही कंगनानं म्हटलंय. 

यापूर्वी, निर्माता हंसल मेहता आणि लेखक अपूर्व असरानी यांनीही विकास बहल यांचं वर्तन असभ्य असल्याचं म्हटलं होतं.