'मै ब्राह्मण हूं; मै चाणक्य हूं'; JNU वादावर बॉलिवूड सेलिब्रिटीचा हादरवणारा Video होतोय व्हायरल

JNU Controversy : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU मध्ये दर दिवशी घडणाऱ्या घटना संपूर्ण देशाच्या नजरा वळवतात. 

Updated: Dec 3, 2022, 09:46 AM IST
'मै ब्राह्मण हूं; मै चाणक्य हूं'; JNU वादावर बॉलिवूड सेलिब्रिटीचा हादरवणारा Video होतोय व्हायरल  title=
Manoj Muntashir on anti brahmin slogans in jnu latest news

JNU Controversy : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU मध्ये दर दिवशी घडणाऱ्या घटना संपूर्ण देशाच्या नजरा वळवतात. संपूर्ण देशातून जिथं जेएनयूमध्ये शिकण्यासाठी विद्यार्थी येतात तिथेच या विद्यापीठामध्ये येणारा प्रत्येक दिवस एक वाद घेऊन येताना दिसतो. पुन्हा एकदा ज्ञानार्जनाच्या या ठिकाणी भींतींवर ब्राह्मणविरोधी घोषणा लिहिण्यात आले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सदर प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी उचलून धरली आहे. याच वादात उडी घेत बॉलिवूड सेलिब्रिटी- गीतकार मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यानं उडी घेत एक व्हिडीओ पोस्ट केला आणि अनेकांचाच रोष ओढावून घेतला. 

'ये है ब्राह्मणों की गौरवगाथा का ट्रेलर'.... असं लिहित मनोजनं एक व्हिडीओ ट्विट केला जिथं तो 'मै ब्राह्मण हूं; मै चाणक्य हूं' असं म्हणताना दिसत आहे. (anti brahmin slogans ) ब्राह्मणांचं महत्वं सांगत त्यानं या व्हिडीओच्या माध्यमातून प्राचीन काळातील काही गोष्टी मांडल्या. क्षत्रियांना शास्त्र आणि शास्त्रांचं शिक्षण देण्याचं उत्तरदायित्व फक्त आणि फक्त ब्राह्मणांचंच होतं, यातही एक ब्राह्मण होता जो इतरांना ज्ञान देऊन महान होत होता, अशा अनेक गोष्टी तो या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतो. 

ब्राह्मणांमुळेच अखंड भारत... 

तो एक ब्राह्मणच होता ज्यानं एका वंचित वनवासी व्यक्तीला सम्राट बनवून अखंड भारताची स्थापना केली, पण दुर्दैवानं आज हे कुणाच्याही लक्षात नाही असंही तो या व्हिडीओतून आवेगात म्हणताना दिसला. मनोजनं हा व्हिडीओ पोस्ट करताच त्यावर अनेकांनीच व्यक्त होण्यास सुरुवात केली. काहींनी त्याच्या म्हणण्याचं समर्थन केलं, तर काहींनी मनोजच्या विचारसरणीवर ताशेरे ओढले. 

हेसुद्धा वाचा : 'या' सुप्रसिद्ध Bollywood Actresses मुस्लीम कुटुंबात जन्मल्या पण हिंदू नावानं मिळवली प्रसिद्धी

 

प्रत्यक्षदर्शींचं काय म्हणणं? 

विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार इंटरनॅशनल स्टडीज II च्या इमारतीच्या भींतींवर ब्राह्मण समुदायाविरोधी घोषणा लिहित त्यांची नासधूस करण्यात आली होती. "ब्राह्मण कैंपस छोड़ो," "वहां खून होगा," "ब्राह्मण भरत छोड़ो," अशा प्रक्षोभक घोषणा तिथं लिहिण्यात आल्या होत्या. आता सदर प्रकरणी कायद्यानं कोणाला शिक्षा होणार याकडे आणि त्या घोषणा नेमक्या कुणी लिहिल्या याकडेच सर्वांचं लक्ष आहे.