VIDEO : अंगावर काटा आणणारा 'मणिकार्णिका' चा टिझर

अफलातून ट्रेलर 

VIDEO : अंगावर काटा आणणारा 'मणिकार्णिका' चा टिझर  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानावतच्या 'मणिकार्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाची जोरदार चर्चा रंहली आहे. कंगनाच्या लूकपासून ते अगदी या सिनेमातील कास्टपर्यंत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला पडू शकतो. मंगळवारी या सिनेमाची टीझर रिलीज झाला. 'मणिकर्णिका' या सिनेमाचा रोमांचक टिझर रिलीज झाला आहे. 2 मिनिटांच्या या टीझरमध्ये कंगनाचा अफलातून लूक दिसत आहे. कंगनाने या सिनेमाच्या माध्यमातून स्वतःबाबत एक्सपेरिमेंट करताना पाहिलं आहे. 

मणिकार्णिका : द क्वीन ऑफ झांसी या सिनेमात भारताच्या स्वातंत्र्याची गोष्ट आहे. जो लढा 1857 साली केला होता. राणी लक्ष्मीबाईचं दमदार कॅरेक्टर कंगनाने साकारलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राधा कृष्ण जगरलमूडी यांनी केलं आहे. गांधी जयंती निमित्त हा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.