'तुझ्याशिवाय 365 दिवस...', पतीच्या निधनानंतर खचली अभिनेत्री

सुखी संसारात पतीने सोडली अर्ध्यावर साथ, निधनानंतर खचलेल्या आभिनेत्रीसाठी 365 दिवस म्हणजे...  

Updated: Jun 30, 2022, 11:02 AM IST
'तुझ्याशिवाय 365 दिवस...', पतीच्या निधनानंतर खचली अभिनेत्री title=

मुंबई : 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' फेम मंदिरा बेदी आणि राज कौशल यांच्या लव्ह स्टोरीबद्दल प्रत्येकाला माहित आहे. 'व्हॅलेंटाईन डे'ला दोघांनी लग्नगाठ बांधली.  पण सुखी संसारात राज कौशलने अर्ध्यावर साथ सोडली. 30 जूनला हृदय विकाराच्या झटक्याने राजने अखेरचा श्वास घेतला. राज कदाचित आज निघून गेला असेल, पण तो मंदिराच्या मनामध्ये कायम राहील. राजच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. पतीच्या आठवणीत मंदिराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

मंदिराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केले आहेत.  पोस्टमध्ये मंदिराने '365 दिवस तुझ्याशिवाय...' असं लिहिलं आहे. एवढंच नाही तर, 'Miss you Raji...' असं लिहिलं आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. 

मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं 30 जूनला निधन झालं आहे. पतीच्या मृत्यूमुळे मंदिरावर दुःखाचं डोंगर कोसळलं. राज यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्यांचे  फोटो व्हायरल झाले. मंदिरा आणि राज यांच्या लग्नाचे फोटो देखील तुफान व्हायरल झाले. मंदिरा बेदीने 14 फेब्रुवारी 1999 मध्ये राज कौशल यांच्याशी लग्न केलं. व्हेलेंटाइन डेच्या दिवशी लग्न केल. 

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली.  आपल्या करिअरमध्ये 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'एंथनी कौन है' सिनेमांमध्ये दिग्दर्शन केलं आहे.  

राज कौशल यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे. आता देखील मंदिराच्या पोस्टवर सेलिब्रिटीचं नाही, तर अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.