#MeToo: साजिद खानला माझं शरीर बघायचं होतं - अभिनेत्रीचा आरोप

अभिनेत्रीचा धक्कादायक आरोप

Updated: Oct 23, 2018, 02:09 PM IST
#MeToo: साजिद खानला माझं शरीर बघायचं होतं - अभिनेत्रीचा आरोप title=

मुंबई : अभिनेत्री मंदाना करीमीने #MeToo चळवळीमध्ये मोठा खुलासा केला आहे. मंदानाने तिच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना सांगितली आहे. मंदाना करीमीने साजिद खानवर टीका करत म्हटलं की, 'त्याने मला सांगितलं होतं की, माझा सेट खूप छान आहे आणि मी कलाकारांच्या जवळ देखील येतो. मला सिनेमासाठी जे कॅरेक्टर हवंय त्यासाठी मला तुझं शरीर बघायचं आहे. त्याच्याकडे माझा फोटो होता तरी त्याला माझं शरीर बघायचं होतं.'
 
'साजिद खानने मला 2014 मध्ये हमशक्ल सिनेमामध्ये एक रोल ऑफर केला होता. त्याने मला त्य़ाच्या ऑफीसमध्ये बोलवलं आणि कपडे काढून दाखवण्यासाठी सांगितलं. साजिदच्या या मागणीनंतर मी हैराण झाले. या दरम्यान माझी मॅनेजर देखील तेथे उपस्थित होती. त्यानंतर आम्ही दोघे लगेचच तेथून निघून गेलो.'

'क्या कूल हैं हम' सिनेमाच्चा डायरेक्टर उमेशवर देखील तिने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अशा वाईट अनुभवांमुळेच मला माझं प्रोफेशन सो़डावं लागलं.' असं देखील तिने म्हटलं.

'या सिनेमाच्या दरम्यान गाण्याच्या शूटसाठी तो मला असे कपडे घालायसा सांगायचा जे माझ्यासाठी नव्हते. मी प्रोड्यूसर एकता कपूरकडे याची तक्रार देखील केली आणि पैसे परत करण्याची तयारी देखील दाखवली. कारण मला या सिनेमातून बाहेर पडायचं होतं. यानंतर एकताने त्याला ऐकवलं पण त्याला काढून नाही टाकलं.'