मुंबई : अभिनेत्री मंदाकिनी ही 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून रातोरात स्टार झाली. तिचा धबधब्याच्या सीन चर्चेचा विषय ठरला होता. या सीनमध्ये मंदाकिनी फक्त पांढऱ्या रंगाच्या साडीत धबधब्याखाली आंघोळ करताना दिसली. त्या काळातील बोल्ड हिरोईनमध्ये मंदाकिनी एक होती. 'राम तेरी गंगा मैली'चा तो सीनही खूप चर्चेत आला होता, ज्यात मंदाकिनी ट्रेनमध्ये बसून आपल्या मुलाला दूध पाजते. हा चित्रपट 1985 मध्ये आला होता आणि 80 च्या दशकात ब्रेस्टफीडिंग करतानाचे ते दृश्य खूपच बोल्ड मानले गेले होते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मंदाकिनीनं तिच्या ब्रेस्टफीडिंग सीनबद्दल सांगितलं. मंदाकिनीनं सांगितले की, तिच्या ब्रेस्ट फीडिंग सीनवर लोकांनी वाटेल ते म्हटले. त्या सीनमध्ये जेवढं क्लीव्हेज दाखवण्यात आलं, आजकाल तर त्यापेक्षा जास्त दाखवतात, असं वक्तव्य मंदाकिनीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिलं आहे.
'हिंदुस्तान टाईम्स'शी बोलताना मंदाकिनी म्हणाली, 'सगळ्यात आधी ब्रेस्टफीडिंग करतानाचे सीन नव्हते. पण त्याला त्या प्रकारे शूट करण्यात आले होते. हीच चित्रपटाची आणि कथेची मागणी होती. हा सीन कसा शूट झाला हे सांगायला गेलं तर ती एक लांबलचक गोष्ट आहे. त्याकाळी माझ्या कपड्यांमध्ये जितकं क्लीव्हेज दिसत होतं, आजकाल त्यापेक्षा जास्त क्लीव्हेज लोक दाखवतात. आजकाल चित्रपटांमध्ये ज्याप्रकारे बॉलिवूड दाखवली जाते त्या तुलनेत ते काहीच नव्हतं. आपण त्याबद्दल बोलायलाही नको. ब्रेस्टफीडिंगचे ते सीन पवित्र होते. त्या सीनला पवित्रतेने शूट करण्यात आले. आजकाल तर चित्रपटात फक्त सेक्शुएलिटी आणि कामकुता दाखवण्यात येते.
मंदाकिनी सध्या तिच्या कमबॅकमुळे चर्चेत आहे. ती 26 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 'मां ओ मां' गाण्यात मंदाकिनी दिसत आहे. जेव्हा मंदाकिनीला विचारण्यात आले की, पद्मिनी कोल्हापुरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मंदाकिनीसोबत ४५ दिवस शूटिंग केल्यानंतर राज कपूर या चित्रपटात तिला रिप्लेस करायचे होचे. मला एवढंच माहीत आहे की प्रत्येकाला गंगा ही भूमिका साकारायची होती. पण राज कपूरला फक्त मला कास्ट करायचे होते कारण त्यांना एक फ्रेश चेहरा हवा होता. ते असेही म्हणाले होते की, मी कोणत्या अभिनेत्रीला गंगा ही भूमिका कशी देऊ शकतो जिचा चेहरा सगळ्यांनी पाहिला आहे.
आणखी वाचा : बोल्ड कपडे अन् Video Call, 'ही' अभिनेत्री ठरतेय चर्चेचा विषय
मंदाकिनी पुढे तिच्या कमबॅकबद्दल बोलताना म्हणाली, मी गेल्या अनेक दिवसांपासून पुनरागमर करण्याचा विचार करत होते आणि आता तिचं स्वप्न पूर्ण झालं आहे. मंदाकिनीला पुन्हा एकदा शूटिंग करण्यात आनंद होतं आहे.