'मला फक्त आईसोबत राहायचं आहे', Aishwarya Rai चा मुलगा आला जगासमोर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंब बच्चन (Bachchan) यांच्या समोर मोठ्या प्रश्न निर्माण झाला आहे. 

Updated: Oct 4, 2022, 02:19 PM IST
'मला फक्त आईसोबत राहायचं आहे', Aishwarya Rai चा मुलगा आला जगासमोर  title=
man claims to be Aishwarya Rai Bachchans son nmp

Aishwarya Rai Bachchan: बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्री (Industry) एक अशी दुनिया आहे, ज्यातून रोज नवीन नवीन गॉसिप (Gossip) उडत असतात. कधी कोणाचं कोणाशी अफेर तर कधी कोणाचा घटस्फोट तर कधी दोघांमध्ये तिसरा...अशातच बी टाऊनमधील सगळ्यात नावाजलेल्या कुटुंबातील एखादी धक्कदायक बातमी समोर आली की संपूर्ण इंडस्ट्रीसोबत मीडियाही हलून जातं. 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंब बच्चन (Bachchan) यांच्या समोर मोठ्या प्रश्न निर्माण झाला आहे. अचानक अनेक वर्षांनंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची सून आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची पत्नी ऐश्वर्या राय हिचा मुलगा जगासमोर आला आहे. काही वर्षांपूर्वी 45 वर्षीय महिलेने स्वतःला अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांची मुलगी असल्याचं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे का 32 वर्षीय व्यक्तीने स्वतःला ऐश्वर्या रायचा मुलगा म्हणवून घेतलं होतं. (man claims to be Aishwarya Rai Bachchans son nmp)

32 वर्षीय संगीत कुमारने (Sangeet Kumar) दावा केला की तो ऐश्वर्या रायचा मुलगा आहे. संगीत कुमारनुसार, ऐश्वर्याने 1988 मध्ये लंडनमध्ये IVF च्या माध्यमातून त्याला जन्म दिला. त्यावेळी ऐश्वर्या राय ही 15 वर्षांची होती.

संगीत कुमारने असाही दावा केला होती की, एकदा तो आपल्या वडिलांसोबत विशाखापट्टणमला (Visakhapatnam) गेला होता, तेव्हा ऐश्वर्या रायच्या कुटुंबाने त्याची चांगली काळजी घेतली होती. स्वतःला ऐश्वर्या रायचा मुलगा म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीची इच्छा होती की त्याने ऐश्वर्या रायसोबत मुंबईत (Mumbai) राहावं. संगीत याचा दावानंतर ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. हे प्रकरण इतकं व्हायरल होत असल्याचं पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला. 

सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, जो माणूस ऐश्वर्या रायचा मुलगा असल्याचा दावा करत आहे तो मानसिक आजारी आहे. याची खातरजमा झाल्यानंतर लोकांमधील हे प्रकरण शांत झालं. जेव्हा अनुराधा पौडवाल यांच्या मुलीचं प्रकरण व्हायरल (Viral) होऊ लागलं तेव्हा हे प्रकरण पुन्हा समोर आलं होतं.