Mamta Mohandas Fighting Vitiligo : दाक्षिणात्य अभिनेत्री ममता मोहनदासनं (Mamta Mohandas) धक्कादायक खुलासा केला आहे. ममतानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ती गंभीर आजारानं त्रस्त असल्याचे सांगितले आहे. ममता ही फक्त 38 वर्षांची आहे. काही वर्षांपूर्वीच ममतानं कर्करोगावर (Cancer) मात केली. आता आणखी एका मोठ्या आजाराचा सामना करत असल्याचे म्हणतं तिनं पोस्ट शेअर केली आहे. ममताला ऑटोइम्यून म्हणजेच त्वेचे संबंधीत एक आजार झाला आहे. यामुळे तिचा स्किन टोन बदलत असल्याचे तिचे म्हणणे आहे.
ममतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. ममता बाहेर बसल्याचे फोटोत दिसत आहे. ममतानं काळ्या रंगाचं टी-शर्ट, जॅकेट आणि पॅन्ट परिधान केली आहे. तर तिच्या हातात ब्लॅक कॉफी असल्याचे पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करत 'प्रिय सूर्य, मी आता तुला मिठी मारते जशी मी याआधी कधीच मारली नव्हती. खूप डाग आहेत, मी माझा स्किन टोन गमावते. मी सकाळी तुझ्या आधी उठते. धुक्यातून येणारी तुझी पहिली किरण पाहण्यासाठी. तुझ्याकडे जे काही आहे ते दे... मी आयुष्यभर तुझी ऋणी असेन. आजपासून कायम स्वरूपी,' असे कॅप्शन ममतानं दिले आहे.
जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर 38 वर्षीय ममतानं या आधी कॅन्सरवर मात केली होती. ती एक कॅन्सर सर्व्हायव्हर. 2009 साली ममतावर हॉजकिन्स लिम्फोमा कर्करोगाचे निदान झाले होते. या कर्करोगाचा तिनं न घाबरत सामना केला. त्यानंतर 2013 तिला परत एकदा कर्करोगाचे निदान झाले होते. यासाठी ती लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा उपचार करण्यासाठी गेली होती. (Cancer Saviour)
हेही वाचा : Salman Khan नं सिमी गरेवालसमोर केलं कबूल, लव्ह लाइफविषयी दिलं 'हे' उत्तर
त्वचारोगाबद्दल बोलायचे तर हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. यामध्ये पीडितेच्या त्वचेचा रंग हळू हळू जातो. त्याच्या शरीरावर पांढरे डाग दिसू लागतात, जे कालांतराने वाढत जातात. ममता मोहनदासच्या करिअरविषयी बोलाचये झाले तर तिने 2005 मध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 'मयुखम' हा तिचा पहिला चित्रपट होता. याशिवाय ममतानं लंका आणि मधुचंद्रलेखा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ममताने तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती अभिनेत्री असण्यासोबतच ती एक बॅकग्राऊंड गायिका आहे.