कॅमेऱ्यासमोर अनकम्फर्टेबल झाली Malaika ची बहीण अमृता, ट्रोल करत नेटकरी म्हणाले, 'जीम बॉडीला काय झालं?'

Malaika Arora Sister Amruta Arora : मलायका अरोराची बहीण अमृताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कॅमेरा पाहताच ती ज्या प्रकारे अनकम्फर्टेबल झाली ते पाहून प्रेक्षकांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. अनेकांनी अमृताला ट्रोल केलं आहे तर असे कपडे परिधान करण्याची काय गरजं असं विचारलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 7, 2023, 12:37 PM IST
कॅमेऱ्यासमोर अनकम्फर्टेबल झाली Malaika ची बहीण अमृता, ट्रोल करत नेटकरी म्हणाले, 'जीम बॉडीला काय झालं?'  title=
(Photo Credit : Instant Bollywood Instagram)

Malaika Arora Sister Amruta Arora : बॉलिवूड अभिनेत्री आणि मलायका अरोराची बहीण अमृता अरोरा ही नेहमची तिच्या व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असते. अमृता अरोरा बहीण मलायका इतकीच स्टायलिश आहे. तिचे देखील योगा क्लासेस किंवा मग जीमला जातानाचे व्हिडीओ आपण पाहतो. अशात अमृताचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अमृतानं परिधान केलेल्या व्हिडीओमुळे तिला किती अनकम्फर्टेबल फील होतं आहे ते दिसत आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केलं आहे. 

मलायकाची बहीण अमृता काल तिच्या नवऱ्यासोबत Bastian Worli पोहोचली होती. या ठिकाणी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अमृतासोबत अभिनेता फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकर देखील पोहोचली होती. त्यावेळचा अमृताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमृताचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूडनं शेअर केला आहे. या व्हिडीओत अमृता तिच्या पतीसोबत गाडीतून येताना दिसते. तर अमृतानं डीप नेक आणि लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला अमृता ही गाडीतून उतरत असताना तिच्या डीप नेक ड्रेसमुळे अनकम्फर्टेबल होताना दिसते. तिच्या हातात असलेल्या पर्सच्या मदतीनं अमृता तिच्या या डीप नेकला लपवताना दिसते. जेनेकरून व्हिडीओ आणि फोटोमध्ये काही विचित्र दिसणार नाही. त्यानंतर तिचा पती येतो आणि तो तिच्यासोबत फोटो काढतो आणि पुढे रेस्टॉरंटमध्ये निघून जातो. अमृताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अमृताशिवाय या रेस्टॉरंटमध्ये शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, संजना सांघी देखील दिसले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम Shivali Parab चा क्रश कोण माहितीये का? अभिनेत्रीनं स्वत: च सांगितलं...

अमृताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, जर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतं होतं तर असा ड्रेस परिधानच का केला? दुसरा नेटकरी म्हणाला, 'जे कपडे सुट करत नाही तसे कपडे परिधान करणं गरजेचं आहे का.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मला कळतं नाही की जर तुम्हीच अशा ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाही आहात तर असे कपडे परिधानचं का करता.' एक नेटकरी म्हणाला, 'या लोकांच्या जगात फॅशन महत्त्वाची आहे इज्जत नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ताईला असे कपडे परिधान करायचे आहेत. आणि लाजही वाटते काय बोलायचं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अमृताच्या जीम बॉडीला काय झालं?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ही सेम करीनाच्या आईसारखी दिसत आहे.'