स्टाईलच्या नादात समोर आल्या Malaika Arora च्या शरीरावरील 'ते' व्रण

Malaika Arora च्या शरीरावरील 'ते' व्रण, अनेक फोटोंमधून आले समोर...   

Updated: Jun 14, 2022, 11:35 AM IST
स्टाईलच्या नादात समोर आल्या Malaika Arora च्या शरीरावरील 'ते' व्रण title=

मुंबई :  अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) वयाच्या 48 व्या वर्षी देखील प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे कायम फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामुळे फिटफ्रिक मलायकाच्या फोटोंच्या प्रतीक्षेत तिचे चाहते आसतात. मलायका तिच्या खासगी त्याचप्रमाणे प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता मलायका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मलायका अनेक ठिकाणी कॉप टॉपमध्ये दिसली.  तेव्हा  प्रेग्नेंसीनंतर तिच्या शरीरावर असलेले व्रण समोर आले. 

मलायका तिच्या सौंदर्य आणि फिटनेससाठी कायम सतर्क असते. योगापासून ते जिमपर्यंत मलायका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत करते. मलायकाही तिची बॉडी अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये फ्लॉंट करते.

मलायका अरोरा जेव्हा क्रॉप टॉप घालून एका कार्यक्रमात पोहोचली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्या पोटावर पडलेल्या खुणांवर खिळल्या होत्या. असं असताना देखील कशाचीही तमा न बाळगता अभिनेत्रीने बिनधास्त होवून कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या.

मलायकाचे स्ट्रेच मार्क्स अनेकदा जिम वेअर्समध्येही दिसले आहेत. मलायका जेव्हा स्पोर्ट्स ब्रा आणि ट्रॅक पॅंट घालून घराबाहेर पडते तेव्हा तिचे स्ट्रेच मार्क लपवण्याऐवजी ती उघडपणे दाखवते.

मलायकाने चाळीशी ओलांडली असली तरी, तिचा ग्लॅमर अद्यप कमी झालेली नाही. फक्त ग्लॅमरचं नाही, तर अभिनेता अर्जुन कपूर सोबत असलेल्या नात्यामुळे देखील मलायका चर्चेत असते.