मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सिनेमांपेक्षा आपल्या फिटनेसमुळे चाहत्यांना वेड लावते आहे. अभिनेत्रीचे वर्क आऊटचे व्हिडिओच देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मलायकाच्या वर्क आऊटमुळे ती कायमच चर्चेत राहिली आहे. मलायकाने स्पेशल पोस्ट करत आपल्या चाहत्यांना एक मजेदार किस्सा सांगितला आहे.
मलायका अरोरा (Malaika Arora) ने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत एक मजेदार किस्सा सांगितला आहे. अभिनेत्रीने सांगितलं की,'कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर घरी येणाऱ्या प्रत्येकाने सांगत होती एक मजेदार किस्सा...' (मलायका - अर्जुनचा रोमांटिक अंदाज पुन्हा व्हायरल)
मलायकाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी लिहिली आहे. 'आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला मलायका सांगत असते की, घाबरू नका मी माझ्या डॉगीला लस लावून घेतली आहे.' पुढे ती म्हणते की,'आता मी त्यांना म्हणते की, घाबरू नका आता मी लस घेतली आहे.' (मलायकाला EX नवरा अरबाज खानकडून मिळालं खास गिफ्ट, शेअर केला VIDEO)
पुढे आणखी एक किस्सा मलायकाने शेअर केला आहे. अभिनेत्री लिहिते की,'मी एका रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये गेले होते. मी हळूच गेट खोलला होता. मी पायाने टॉयलटची सीट उचलली. मी टिश्यूच्या मदतीने पाण्याचा वापर केला. हात धुतले आणि हाताच्या कोपऱ्याने बाथरूमचा दरवाजा बंद केला. पण पुन्हा टेबलवर जेव्हा आले तेव्हा लक्षात आलं की पँटच घालायला विसरले.' (मलायकाचं आलिशान घर; फोटो व्हायरल)
झगमगत्या दुनियेत कायम पार्ट्या सुरू असतात आणि या पार्ट्यांमध्ये अनेक मोठे कलाकार देखील हजेरी लावतात. आता देखील अमृता अरोराने घरी पर्टी आयोजित केली. ज्यात इंडस्ट्रीचे अनेक बडे स्टार्स आले होते. या पार्टीत सध्या चर्चेत असणारा कपल मलायका अरोरा(Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) देखील आले होते. बुधवारी रात्री अभिनेत्री अमृता अरोराने (Amrita Arora) हाऊस पार्टीचे आयोजन केले. अनेक सेलिब्रिटी या पार्टीला आले होते पण या पार्टीत सर्वांचे लक्ष फक्त आणि फक्त मलायका आणि अर्जुनवर होतं . रेड शॉर्ट आणि ट्रॅक जॅकेटमध्ये मलायका अरोरा ग्लॅमरस दिसत होती. अर्जुन कपूर कॅज्युअल ब्लॅक टी-शर्टमध्ये कूल दिसत होता.