महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या करतोय 'या' मुलीला डेट? एका फोटोमुळं चर्चांना उधाण

सोशल मीडियावर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर सगळे सत्या मांजरेकरच्या सोशल मीडिया अकाऊंट सर्च करत आहेत.  

Updated: Nov 11, 2022, 03:27 PM IST
महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या करतोय 'या' मुलीला डेट? एका फोटोमुळं चर्चांना उधाण title=

मुंबई : लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या आगामी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ची (Vedat Marathe Veer Daudale Saat) घोषणा केली. चित्रपटातील कलाकारांमुळे सोशल मीडियावर एक वेगळा वाद सुरु झाला आहे. एकीकडे अक्षय कुमार (Akshay Kumar) हा छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिका साकारत आहे, तर दुसरीकडे महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर (Mahesh Manjrekar's Son Satya Manjrekar) हा मावळ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांनी सत्याला मावळ्याच्या भूमिकेत पसंती दिली नाही. या कारणामुळे सत्या हा सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय आहे. सत्याचं सोशल मीडिया अकाऊंट देखील नेटकरी चेक करत आहेत. यासगळ्यात सत्यानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चां सुरु झाल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वी सत्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सत्यानं मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत 'Forever and always' असे कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे तो नक्कीच रिलेशनशिपमध्ये आहे असे नेटकरी म्हणत आहेत. (Mahesh Manjrekar s Son Satya s Dating Rumours Goes Viral because of social media post) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या फोटोमध्ये जी मुलगी सत्यासोबत आहे तिचं नाव श्रुतिका शिंदे असे आहे. सत्यानं या आधीही श्रुतिकासोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. सत्यानं शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'तुम्हाला दोघांना एकत्र पाहून मला आनंद झाला.' यावर उत्तर देत सत्या म्हणाला, 'आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. ती माझी चांगली मैत्रीण आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तू तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहेस का?' नेटकऱ्याच्या या प्रश्नावर देखील सत्यानं उत्तर दिलं आहे. सत्या म्हणाला, 'ती माझी चांगली मैत्रिण आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, सत्यानं बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘आई’ या चित्रपटात तो दिसला होता. यानंतर सत्यानं ‘जाणिवा’, ‘पोरबाजार’ या चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय सत्यानं ‘फन अनलिमिटेड’, ‘1962 द वॉर इन द हिल्स’ आणि ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.