टेबलावर ग्लास अन् नोटांचा खच… पार्टीत चक्क जुगार खेळताना दिसले ‘हे’ सुपरस्टार!

Mahesh Babu And Venkatesh Poker :  महेश बाबू आणि वेंगटेश या दोघांचा क्लबमध्ये पोकर खेळतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 6, 2023, 02:38 PM IST
टेबलावर ग्लास अन् नोटांचा खच… पार्टीत चक्क जुगार खेळताना दिसले ‘हे’ सुपरस्टार! title=
(Photo Credit : Social Media)

Mahesh Babu And Venkatesh Poker : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू आणि वेंकटेश हे लोकप्रिय कलाकारांपैकी आहेत. त्या दोघांचे लाखो चाहते देखील आहेत. सध्या त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांना पत्ते खेळताना पाहून सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पत्ते खेळताना हे दोघं आनंदी दिसत आहेत आणि त्याशिवाय ते पोकर खेळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यासोबत टेबलवर नोटा पाहायला मिळत आहेत. 

या व्हायरल होत असलेला फोटोत महेश बाबूनं नारंगी रंगाचं स्वेटशर्ट परिधान केलं आहे. तर वेंकटेश यांनी काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर व्हायरल होत असलेल्या फोटोत त्या दोघांच्यासमोर 500 रूपयांची गड्डी पाहायला मिळत आहे. तर कार्ड वाटताना ते दोघं आनंदी दिसत आहेत. त्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर ते दोघं पोकर खेळत असल्याचे म्हटले जात आहे. पोकरमध्ये पैशांची देवाण-घेवाण होते. रिपोर्ट्सनुसार, ते दोघं एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम एका लोकप्रिय उद्योगपतीच्या घरी होता. त्यांनी नुकताच घरी एक क्लब हाऊस उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोबद्दल सत्य कहाणी समोर आलेली नाही. मात्र, महेश बाबूचे चाहते त्याचा हा फोटो पाहून आश्चर्यचकीत झाले आहेत. त्याच कारण म्हणजे खऱ्या आयुष्यात तो रिझर्व आणि अशा कोणत्याही गोष्टींपासून लांब राहण्यासाठी ओळखला जातो. 

महेश बाबूच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या 'गुंटूर कारम' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रीलीला आणि मीनाक्षी चौधरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट संक्रातच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय महेश बाबू हा एसएस राजामौली यांच्या एका चित्रपटात दिसणार असून त्याला सध्या 'एसएसएमबी29' असे नाव देण्यात आले आहे. 

हेही वाचा : श्मिकाचा 'हा' व्हिडीओ पाहून अमिताभ यांना देखील वाटली भीती! पोस्ट शेअर करत व्यक्त केली चिंता

दरम्यान, दुसरीकडे दग्गुबाती वेंकटेशच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी अनिल रविपुडी यांच्या 'F3: फन एंड फ्रस्ट्रेशन' मध्ये वरुण तेज कोनिडेलासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, सैलेश कोलानू द्वारा दिग्दर्शित अॅक्शन-थ्रिलर चित्रपट सैंधवमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट महेश बाबूच्या 'गुंटूर कारम' या चित्रपटासोबत संक्रातिच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.