MS Dhoniची एक्स गर्लफ्रेंड लवकरच करणार साखरपुडा

धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या नव्या आयुष्याची सुरूवात 

Updated: Apr 8, 2021, 04:44 PM IST
MS Dhoniची एक्स गर्लफ्रेंड लवकरच करणार साखरपुडा title=

मुंबई : अभिनेत्री राय लक्ष्मी (Raai Laxmi) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. राय लक्ष्मी क्रिकेटर धोनीची एक्स गर्लफ्रेंड होती. आता राय लक्ष्मी मागचं सगळं विसरून नव्या आयुष्याची सुरूवात करणार आहे. ती तिच्या पार्टनरसोबत साखरपुडा करणार आहे. तिच्या साखरपुड्याची तारीख देखील सोशल मीडियावर जाहीर केली. त्यामुळे तिच्या नव्या आयुष्यासाठी  नेटकरी शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने चाहत्यांना माहिती दिली आहे. 

'गेल्या अनेक दिवसांपासून लोक मला एक प्रश्न विचारत आहेत. आता मी त्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. मला असे वाटते की माझ्या आयुष्यात काय घडत आहे, यात कोणालाही अधिक रस नाही. फार कमी लोकांच्या उपस्थितीत मी साखरपुडा करत आहे.' असं सांगत राय लक्ष्मी 27 एप्रिल रोजी साखरपुडा करणार आहे. 

ती पुढे म्हणाली, 'सगळं काही अतिशय घाईत होत आहे. पण माझं कुटुंब आणि मी फार आनंदी आहोत. मी त्या व्यक्तीची होण्यासाठी तयार आहे, ज्याच्या सोबत मला पूर्ण आयुष्य जगायचं आहे.' असं राय लक्ष्मीने केलं आहे. 

महेन्द्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni)च्या करियरच्या सुरूवातीला त्याचं नाव अभिनेत्री राय लक्ष्मीसोबत जोडलं गेलं होतं. पण त्यांचं नात तुटण्यामागचं कारण अद्याप कळू ळकलेलं नाही. एका मुलाखतीत राय लक्ष्मीने धोनीसोबतच्या नात्याला एक चूक म्हणून सांगितलं होतं.