Gautami patil and Madhuri pawar : महाराष्ट्राची लावणी ही सगळ्यांना आवडणारी आणि तितकीच लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात लावणी म्हटलं की आता दोन नावं समोर येतात आणि ती म्हणजे माधुरी पवार आणि गौतमी पाटील. या दोघींच्या कार्यक्रमांना चांगलीच गर्दी पाहायला मिळते. त्या दोघी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. मात्र, त्या दोघींचे एकमेकांशी पटत नाही असं म्हणतात. दरम्यान, या सगळ्यात त्या दोघी एका कार्यक्रमात एकत्र दिसल्या. त्यावेळी त्या दोघींनी डान्सही केला. त्यामुळे आता त्या दोघींपैकी कोणी प्रेक्षकांची मने जिंकली अशी चर्चा सुरु झाली आहे. तर याशिवाय माधुरी आणि गौतमीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हडपसर येथे असलेल्या ‘टिओस कॅफे’च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पोहोचले होते. माधुरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावेळी माधुरीनं नारंगी रंगाची साडी नेसली आहे. जेव्हा माधुरी 'अगं बाई' या गाण्यावर डान्स करते तिथे उपस्थित असलेल्या लोकांचा गोंधळ सुरु होतो आणि ते मोठ मोठ्यानं माधुरीचं नाव घेत ओरडताना दिसतात. तर दुसरीकडे गौतमीनं देखील तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गौतमी देखील डान्स करताना दिसते. गौतमीचा हा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. पण माधुरी आणि गौतमीमध्ये कोणी बाजी मारली हा प्रश्न असेल तर नक्कीच माधुरीनं मारली असं म्हणता येईल कारण तिचा आणि प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद आहे.
हेही वाचा : व्हायरल क्लिपवर पहिल्यांदाच बोलली गदर-2 ची अभिनेत्री; माझ्याकडे त्यापेक्षा मोठी बातमी आहे!
दरम्यान, माधुरीनं एका मुलाखतीत गौतमीच्या डान्सवर वक्तव्य केलं होतं. त्यात ती म्हणाली होती की ही लावणी नाही ना मग जिथे हे डीजे शो होतात तिथे जाऊन नाचा. इथे येईन काय करतायत ही घाण... आणि ही घाण नंतर आम्हालाच साफ करावी लागणार आहे. माधुरीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरु झाला होता. माधुरी आणि गौतमीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. माधुरीच्या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की आम्ही गौतमीचे फॅन आहोत, 'तु फक्त तिला नाव ठेवतेस तु तिच्या वर जळतेस.' तर तिच्या बाजुनं कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'माधुरी पवार एकच नंबर.' तर गौतमीच्या व्हिडीओवर देखील अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'या डान्सला काहीच अर्थ नाही'. तर दुसरा नेटकरी म्हणाला की 'हे छत्रपतींचे संस्कार नाही... सुधरा अजून वेळ गेलेली नाही..' तर तिच्या बाजुनं कमेंट करत नेटकरी म्हणाला, 'लाखों दिलों कि धडकन गौतमी पाटील.