''धक धक गर्ल माधुरी'' तुम्हाला आवडते का? पण या व्यक्तीने लग्नाचा प्रस्ताव परत पाठवला होता...

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने नुकताच आपला 54 वा वाढदिवस साजरा केला. 

Updated: May 17, 2021, 01:52 PM IST
 ''धक धक गर्ल माधुरी'' तुम्हाला आवडते का? पण या व्यक्तीने लग्नाचा प्रस्ताव परत पाठवला होता... title=

मुंबई : धकधक गर्ल माधुरी दीक्षितने नुकताच आपला 54 वा वाढदिवस साजरा केला. जिच्या एका स्माईलवर लाखों लोकं फिदा आहेत. भलेही माधुरीने वयाची 50 वर्ष ओलांडली असतील पण तिचं सौंदर्य आजही कायम तसच्या-तसचं आहे. आजही लोकं माधुरी यांच्या स्टाईलच्या मागे वेडे आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत आणि त्यावेळी त्यांचं नाव बॉलिवूडच्या अनेक स्टार्सशी जोडलं गेलं होतं. अशा परिस्थितीत जेव्हा माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेनेशी लग्न केलं तेव्हा लाखो चाहत्यांची हृदयं तुटली. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? की, जेव्हा माधुरी दीक्षितच्या लग्नाची चर्चा चालू होती, तेव्हा एका प्रसिद्ध गायकाने तिच्याशी लग्न करायला नकार दिला होता.

हे आश्चर्यचकित करणारं आहे की, जिच्या सौंदर्यावर प्रत्येकजण फिदा आहे, तिला कोणीही नाकारू शकतं? तर मग जाणून घेवूया माधुरीशी लग्न करायला कोणी नकार दिला होता आणि मग माधुरीने डॉक्टर नेनेसोबत कसं लग्न केलं.

माधुरी दीक्षितशी लग्न करायला नकार देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, जेष्ठ गायक सुरेश वाडकर आहेत. माधुरी सुरेश यांच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान होती. वृत्तानुसार माधुरीच्या आई-वडिलांची तिनं चित्रपटांत करिअर करावं, आशी बिलकुल ईच्छा नव्हती. अशा परिस्थितीत तिच्या पालकांनी लग्नासाठी मुलं पाहण्यास सुरुवात केली. याच दरम्यान माधुरीचं स्थळ प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पाठवलं गेलं.

मात्र मुलगी खूप बारीक असल्याचं सांगत सुरेश वाडकर यांनी त्यावेळी हे स्थळ नाकारलं होतं. हे स्थळ नाकारल्यानंतर माधुरीचे आई-वडील खूप चिंतेत पडले. त्यांना वाटलं की, जर माधुरी चित्रपटांमध्ये अजून सिनेमांत काम करू लागली, तर तिच्या लग्नात आणखीन अडचणी येतील.

1984 मध्ये तिने 'अबोध' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर 'तेजाब', 'राम लखन', 'परिंदा', 'दिल', 'दिल तो पागल है', 'हम आपके हैं कौन', 'देवदास', 'पुकार', लज्जा 'यासारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमधून माधुरीने सुपरहिट सिनेमा दिले.

माधुरीने केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या नृत्याने आणि अभिव्यक्तीनेही सर्वांची मन जिंकली. माधुरीचं नाव अनेक बॉलिवूड कलाकारांशी जोडले गेलं. संजय दत्त आणि तिच्या अफेअर्सचे किस्से बरेच चर्चेत होते. दोघांची जवळिकता पाहून लवकरच त्यांचं लग्न होईल असं वाटायचं. मात्र, जेव्हा संजय दत्तला जेल झाली तेव्हा माधुरीने त्याच्यापासून लांब जायचा निर्णय घेतला.

यानंतर माधुरी दीक्षितची भेट डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत झाली. या दोघांची भेट माधुरीच्या भावाने घडवून आणली. पहिल्या भेटीतच त्यांची चांगली मैत्री झाली. यानंतर जेव्हा ही भेट प्रेमात बदलली तेव्हा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. माधुरी म्हणाली होती, 'श्री राम नेने मला भेटले तेव्हा त्यांना माहित नव्हतं की मी भारतात किती प्रसिद्ध आहे ते. त्यांनी मला कायम सामान्य मुलीप्रमाणे वागणूक दिली. मला म्हणूनच ते आवडले'.

 यानंतर माधुरीने 7 ऑक्टोबर 1999 रोजी श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. आज माधुरीला दोन मुलगे आहेत आणि ती आपल्या कुटूंबासोबत खूप आनंदी आहे. श्रीराम नेनेही भारतात शिफ्ट झाले. यासाठी माधुरी स्वत: ला लकी समजते.