Madhuri Dixit ने आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी गिफ्ट, Video व्हायरल

होणाऱ्या आई आलियाला आशिर्वाद देण्यासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हीने पण खास गिफ्ट पाठवलं आहे. 

Updated: Oct 7, 2022, 05:30 PM IST
Madhuri Dixit ने आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी गिफ्ट, Video व्हायरल title=
madhuri dixit sends cutest gift for alia bhatt and Ranbir Kapoor nmp

Madhuri Dixit : 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटाच्या यशामुळे अभिनेत्री आलिया भट्ट कपूर (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे दोघे सध्या आनंदात आहेत. त्याहीपेक्षा हे जोडपं अजून एका कारणामुळे सतत चर्चेत असतं ते म्हणजे त्यांच्याकडे लवकरच पाळणा हलणार आहे. नुकताच आलियाच्या बेबी शॉवर (Baby shower) सोहळा मोठ्या थाट्यात पार पडला. 

होणाऱ्या आई आलियाला आशिर्वाद देण्यासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हीने पण खास गिफ्ट पाठवलं आहे. रणबीर-आलिया या होणाऱ्या आई-वडिलांना माधुरी दीक्षितने बाल गोपाळाची मूर्ती (Baal Gopal) भेट म्हणून पाठवली आहे. (madhuri dixit sends cutest gift for alia bhatt and Ranbir Kapoor nmp)

नीतू कपूरने (Neetu Kapoor) मानले आभार

झलक दिखलाजा (Jhalak Dikhhla) या टीव्ही शोच्या सीझन 10 मध्ये रणबीर कपूरची आई नीतू कपूर पाहुणे म्हणून आली होती. शो दरम्यान, स्पर्धक नीती टेलरने (Neeti Taylor) आपल्या पर्फोमेंसने रणबीर कपूरच्या लग्नाला र्ट्रिब्यूट दिलं.माधुरी दीक्षितने आलिया आणि रणबीरच्या मुलाला बाल गोपालची मूर्ती भेट दिली आहे. रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी ही भेट घेतली आणि माधुरीचे आभार मानले.