'मन में शिवा...' पानीपतचं नवं गाणं रिलीज

सोशल मीडियावर पसंती 

Updated: Nov 23, 2019, 04:06 PM IST
'मन में शिवा...'  पानीपतचं नवं गाणं रिलीज title=

 मुंबई : 'मेरे मन में शिवा...' म्हणतं लढाईच्या यशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारं "पानीपत' सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानीपत हा सिनेमा 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अर्जून कपूर, क्रिती सेननसोबतच संजय दत्त महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

पानीपत सिनेमा पानीपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित हा सिनेमा असून काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. हे गाणं अर्जून कपूर आणि क्रिती सेनन यांच्यावर आधारित आहे. या गाण्यात सगळ्याच स्टारकास्टने जबरदस्त डान्स केला आहे. हे गाणं भव्य सेट्सवर चित्रीत केलं आहे. 

कुणाल गांजावाला, दिपांशी नागर आणि पद्मनाभ गायकवाड यांनी गायलं आहे. तर गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर गाजलं आहे. 

सदाशिव राव यांची भूमिका अर्जून कपूर साकारत आहे. पेशवा बाजीरावांचे भाचे आणि पानीपतच्या तिसऱ्या लढाईत मराठा सेनेचे सरदार सेनापतीच्या रुपात अर्जून दिसणार आहे, क्रिती सेनन मराठी महाराणीच्या रुपात दिसणार आहे. या सिनेमात पार्वतीबाईंच कॅरेक्टर ती साकारत आहे. तर संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारत आहे.