Lust Stories 2 Trailer : विजय वर्मा- तमन्ना भाटियाच्या Intimate केमिस्ट्रीपुढे बाकी सगळं फिकं, पाहा Video

काही दिवसांपूर्वीच अभिनेता vijay varma आणि tamannaah bhatia यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली. एकिकडे या नात्याची चर्चा सुरु असतानाच आता दुसरीकडे या जोडीची रोमँटिक केमिस्ट्री सर्वांनाच पाहायला मिळत आहे. 

सायली पाटील | Updated: Jun 21, 2023, 02:28 PM IST
Lust Stories 2 Trailer : विजय वर्मा- तमन्ना भाटियाच्या Intimate केमिस्ट्रीपुढे बाकी सगळं फिकं, पाहा Video  title=
lust stories 2 vijay varma tamannaah bhatia sizzling chemistry watch viral video

Lust Stories 2 Trailer : अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया (vijay varma tamannaah bhatia) यांचं प्रेमाचं नातं सध्या बॉलिवूडमध्ये बरंच चर्चेत आहे. एका सीरिजच्या निमित्तानं त्यांची भेट होते काय आणि पुढे हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडते काय. एखादी कथा वाटावी अशाच वळणांवरून त्यांची ही प्रेमकहाणी जाताना दिसत आहे. त्यातच आता प्रेक्षकांना या जोडीची केमिस्ट्रीही पाहण्याची संधी मिळत आहे. 

निमित्त ठरतंय ते म्हणजे Lust Stories 2 या सीरिजचा ट्रेलर. नेटफ्लिक्सच्या या नव्या अॅमी नॉमिनेटेड अँथोलॉजीचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, अवघ्या काही मिनिटांच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सहकलाकारांच्या भूमिकांची झलक असतानाही ट्रेलरमधील आकर्षण ठरत आहेत विजय आणि तमन्ना. 

अमित रविंद्रनाथ वर्मा, आर.बाल्की, सुजॉ घोष आणि कोंकणा सेन शर्मा यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या काही लघुकथा या सीरिजच्या निमित्तानं प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यामध्ये विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया या जोडीव्यतिरिक्त अमृता सुभाष, अंगद बेदी, काजोल, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर, नीना गुप्ता असे कलाकार झळकणार आहेत. 

हेसुद्धा वाचा :होय, आमचं आहे! तमन्नाने विजयसोबतच्या Relationship वर केलं शिक्कामोर्तब; म्हणाली, "मला त्याच्याबद्दल..."

 

सुजॉय घोष यांच्या मते Lust Stories 2 मधून वासनेची विविध रुपं पाहता येमार आहेत. तब्बल 190 देशांमध्ये प्रदर्शनासाठी सज्ज असणाऱ्या या सीरिजविषयी सांगताना अभिनेत्री/ दिग्दर्शिका कोंकणा सेननं वेगळाच दृष्टीकोन मांडत सीरिजविषयी आपली बाजू स्पष्ट केली. स्वातंत्र्याच्या शोधात असणारी एक महिला स्वत:च्या आयुष्यावर असणाऱ्या नियंत्रणाविषयी नेमका कसा विचार करते हेच आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केल्याचं ती म्हणाली. 

नीना गुप्ता पुन्हा जिंकतायत मनं... 

Lust Stories 2 च्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याही अभिनयानं प्रेक्षकांच्या नजरा वळवल्या असून, त्या पुन्हा एकदा चौकटीबद्ध भूमिकांना शह देताना दिसत आहेत. थोडक्यात संपूर्ण स्टारकास्ट एकिकडे आणि नीना गुप्ता एकिकडे अशी अभिनयाची आगळीवेगळी स्पर्धा या सीरिजच्या निमित्तानं पाहता येणार आहे. तेव्हा आता 29 जून 2023 ला प्रदर्शित होणाऱ्या या Lust Stories 2 ला प्रेक्षकपसंती किती मिळते हेच पाहण औत्सुक्याचं ठरेल.