अभिनेत्रीने एका सेफ्टी पिनवर सावरला ड्रेस, फोटो व्हायरल

सोशल मीडियाच्या जगात सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.

Updated: Feb 25, 2022, 08:29 PM IST
अभिनेत्रीने एका सेफ्टी पिनवर सावरला ड्रेस, फोटो व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. बॉलिवूड अभिनेत्री मंदाना करीमीनेही असंच काहीसे केलं आहे. या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे. मात्र या ड्रेसशी संबंधित व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं.  

मंदाना करीमीचा ड्रेस
इंस्टाग्रामवर बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध मॉडेल अभिनेत्री मंदाना करीमीला लाखो लोकं सोशल मीडियावर फॉलो करतात. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोसल मीडियावर शेअर करत असते. मंदानाने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये इंस्टाग्राम वर्सेस रिएलिटी दाखवली आहे. मंदानाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मंदाना दाखवत आहे की, तिच्या ड्रेसच्या मागच्याबाजूला अनेक मोठ्या सेफ्टी पिन आहेत, ज्यामुळे तिचा ड्रेस फिट झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यानंतर मंदाना फोटोमध्ये पोज देताना दिसत आहे. मंदानाने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'सोशल मीडियाला मूर्ख बनायला देऊ नका! तुम्ही पहात असलेली प्रत्येक गोष्ट खरी, आरामदायक  किंवा बनवायला सोपी नसते. यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि कधीकधी याला अनेक पिना जोडलेल्या असतात.