शशी कपूरच्या कडेवर असणाऱ्या या मुलीला ओळखलंत का आज करतेय टीव्हीवर राज्य..

हिच्या वडिलांचे आणि शशी कपूरचे खूप जवळचे संबंध होते. टीव्ही दुनियेतील क्वीन म्हणून आज तिची ओळख आहे छोट्या पडद्यावर तिच्या इतकी प्रसिद्धी कोणालाच नाहीये.

Updated: Aug 7, 2022, 02:57 PM IST
शशी कपूरच्या कडेवर असणाऱ्या या मुलीला ओळखलंत का आज करतेय टीव्हीवर राज्य..   title=

शशी कपूर यांच्या कडेवर असणारी ही गोंडस मुलगी पाहिलीत ..कोण असेल बरं ? थोडा विचार करून बारकाईने पाहून बघा बार 

आज ही चिमुकली टीव्हीवर राज्य करतेय . हिच्या वडिलांचे आणि शशी कपूरचे खूप जवळचे संबंध होते. टीव्ही दुनियेतील क्वीन म्हणून आज तिची ओळख आहे छोट्या पडद्यावर तिच्या इतकी प्रसिद्धी कोणालाच नाहीये.

लहानपासूनच इंडस्ट्री आहे खूप जवळची 

तर ही मुलगी आहे रूपाली  गांगुली.. ४५ वर्षीय हि अभिनेत्री लहानपानापासूनच फिल्मी जगतात सक्रिय आहे.अनुपमा या सीरियलमध्ये ती महत्वाची भूमिका साकारतेय गेली 2 वर्षांपासून ही मालिका सुरु आहे .महत्वाचं म्हणजे 2 वर्षांपासून टीआरपी(TRP) मध्ये ही मालिका नंबर 1 आहे.आणि हा देशातील नंबर 1 टीआरपी शो आहे 

रुपाली गांगुली प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथा लेखक अनिल गांगुली यांची मुलगी आहे. त्याचा भाऊ विजय गांगुली हा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि निर्माता आहे. 'चका चक'मधील सारा अली खान साठी आणि 'अतरंगी रे'मध्ये विजय गांगुलीने कोरिओग्राफी केली होती.

रुपाली गांगुलीला तिच्या घरातूनच  अभिनय कौशल्याचा वारसा लाभला आणि वयाच्या ७ व्या वर्षी अभिनय विश्वात तिने प्रवेश केला.लहानपणापासूनच फिल्मी वातावरणात वाढलेली रुपाली गांगुली वडिलांच्या फिल्म्स च्या साइट्सवर जाऊन येऊन असायची म्हणून बऱ्याच सेलिब्रेटींसोबत तिची ओळख होती
 
आज रुपाली गांगुली एक अभिनेत्रीच नाही तर एक बिझनेसवुमन देखील आहे. तिची स्वतःची जाहिरात एजन्सीही आहे. रिपोर्ट्सनुसार, रुपाली गांगुली 'अनुपमा'च्या एका एपिसोडसाठी दीड ते तीन लाख रुपये घेते. त्यांची एकूण संपत्ती 12 ते 15 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.