मुंबई : भारतात सिंगर-रॅपर सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर आणखी एका रॅपरचा गोळ्या घालून हत्या केल्याचं प्रकरण उघड झालं आहे. नक्की सेलिब्रिटी लोकांवर कोणाचा काय राग आहे असा प्रश्न उपस्थीत झाला आहे. तसे पाहाता रॅपर ट्रबलची जॉर्जियामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रॅपर ट्रबल हा मुळचा भारताचा नसला, तरी संगीत विश्वासाठी मात्र तो जोरदार धक्का आहे.
यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, रॉकडेल काउंटी शेरीफचे प्रवक्ते जेडेडियाह कँटी यांनी सांगितले की, ट्रबल लेक सेंट जेम्स अपार्टमेंटमध्ये 34 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा होत्या. परंतु त्याला घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले.
शेरीफ कार्यालयाने सांगितले की, या ट्रबलचे खरे नाव मेरील सेमोंटे ओर (Mariel Semonte Orr) आहे. त्याच्या हत्येप्रकरणी संशयित जमीचेल जोन्ससाठी अटक वॉरंट प्राप्त झाले आहे. मात्र, त्याला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही.
शेरीफच्या कार्यालयानुसार, ट्रबल हा अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये एका महिला मैत्रिणीला भेटायला जात होता. तेव्हा अचानक हा सगळा प्रकार घडला. त्याच्या मैत्रीणीच्या घरी त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली.
त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, रेकॉर्डिंग कंपनी डेफ जॅमने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, आमचे विचार आणि प्रार्थना मुले, प्रियजन आणि ट्रबलच्या चाहत्यांसोबत आहेत. त्याच्या शहरासाठी तो एक खरा आवाज आहे, जो सर्वांसाठी एक प्ररणा आहे.
आम्ही तुम्हाला सांगूया की ट्रबलने 2011 मध्ये '17 डिसेंबर' या शीर्षकासह पहिला मिक्सटेप रिलीज केला होता. परंतु त्याने 2018 मध्ये 'एजवूड' (Edgewood) अल्बम सोडला.